Nitin Gadkari: निवडणूकीबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचं सुचक वक्तव्य, पुढील निवडणूकीतील रणनीतीबाबत घोषणा

पुढील निवडणुकीबाबत पचायला जड पण जरा अजब वक्तव्य नितीन गडकरींनी केलं आहे.

Union minister Nitin Gadkari (Photo Credits: IANS)

गेल्या काही दिवसांपासून केद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) सध्या त्यांच्या विविध वक्तव्यामुळे चर्चेत आहेत. नितीन गडकरी राजकारणातून (Politics) बॅक फूटवर (Back Foot) येत आहेत का याबाबतच्या शक्यता वर्तवण्यात आल्या होत्या. पण पुढील निवडणूकीतील (Election) स्वतच्या रणनीतीबाबत घोषणा करत गडकरींनी या चर्चांना पुर्णविराम दिला आहे. येणाऱ्या पुढील निवडणुकीबाबत पचायला जड पण जरा अजब वक्तव्य नितीन गडकरींनी केलं आहे. निवडणूक म्हण्टलं की मोठा प्रचार (Election Camping ),पोस्टर (Poster) हार तुरे या बाबी सामान्य आहेत. पण येणाऱ्या निवडणूकीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी या सगळ्या शिवाय निवडणुक लढवणार असल्याची घोषणा नितीन गडकरींनी केली आहे. मुंबईतील (Mumbai) अंधेरी (Andheri) येथील टऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ लोकल सेल्फ गर्व्हमेंट'च्या दीक्षांत कार्यक्रमात नितीन गडकरी बोलत होते.

 

केद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले, पुढच्या निवडणुकीत मी कटआउट (Cut Out) लावणार नाही. कार्यकर्त्यांना चहापाणी देणार नाही आणि पोस्टरही लावणार नसल्याचे ठरवलं आहे. निवडणुकीत (Election) मत द्यायचे आहे तर द्या नाहीतर नका देऊ असे म्हटले तरीसुद्धा लोक मत देतील. कारण लोकांना चांगलं काम करणारा पाहिजे असतो, असं वक्तव्य नितीन गडकरींनी केलं आहे. नितीन गडकरींच्या कामचं कौतुक देशाच्या कानाकोपऱ्यातून होताना दिसते. फक्त राजकीय नेते मंडळीचं नाही तर देशातील प्रत्येक नागरीक गडकरींच्या कामाची दाद देतो. गडकरींनी त्यांचं कामचं त्याचा प्रचार करत त्यामुळे  त्यांना इतर पध्दतीच्या प्रचार भानगडीत पडायची गरज नाही असा इशारा अप्रत्यक्षपणे गडकरींनी दिला आहे.(हे ही वाचा:- PM Modi: पंतप्रधान मोदी आजपासून गुजरात दौऱ्यावर, विविध प्रकल्पांचं करणार उद्घाटन)

 

नितीन गडकरी (Nitin Gadkari) कायमच आपल्या अनोख्या कार्यशैलीसाठी चर्चेत असतात. केवळ भाजपकडूनचं (BJP) नाही तर विरोधकाकडून देखील गडकरींच्या कामाचं कौतुक होत. गडकरी म्हणजे स्पष्ट वक्ते. भाजपचे सरकारमधील नितीन गडकरी एक महत्वाचे नेते असुन देखील बरेचदा ते परखडपणे स्वतच्या भुमिका मांडताना दिसतात. नुकतचं भाजपच्या सदस्यीय समितीतून (Bjp Parliamentary board) नितीन गडकरींना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. याच बरोबर नितीन गडकरींचे पंख छाटण्याचा प्रयत्न केला जात असल्याची चर्चा देशाच्या राजकारणात होवू लागली.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now