IPL Auction 2025 Live

जालंदर: कुटुंबीयांनी मतं दिली नाहीत म्हणून उमेदवार रडला ढसाढसा (व्हिडिओ)

या वेळी प्रतिक्रिया देताना त्यांनी सांगितले की, इव्हीएममध्ये फेरफार झाल्यामुळेच आपला पराभव झाला, असा आरोप केला. दरम्यान, आपल्या कुटुंबीयांनीच आपल्याला मतं दिली नाहीत तर, तुम्ही कसे विजयी होणार असा सवाल पत्रकाराने केला. या प्रश्नाला उत्तर देण्याऐवजी नितू सुरतन वाला हे थेट रडायलाच लागले.

Neetu Shatra Wala | (Photo Credit : YouTube)

Lok Sabha Election Results 2019: लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला. काही उमेदवार निवडूण आले. अनेक पराभूत झाले. प्रत्येकांने जय-पराजयाचा आनंद आपापल्या पद्धीतीने व्यक्त केला. पण, या सगळ्यात पंजाब राज्यातील जालंदर (Jalandhar) लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार नितू सुतरन वाला (Neetu Shatra Wala) यांना या पराभवाचे दु:ख काहीसे अधिकच झाले. या दु:खात ते अक्षरश: ढसाढसा रडू लागले. तेही कॅमेऱ्यासमोर. आता त्यांच्या रडण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावरही व्हायरल झाला आहे. खरेतर आपल्या पराभवापेक्षा त्यांना अधिक दु:ख हे की त्यांना आपल्या कुटुंबियांनीच मतदान दिले नाही.

जालंदर येथून निवडणूक लढविणाऱ्या नितू सुरतन यांना एकूण पाच मतं मिळाली. त्यामुळे त्यांची अनामत रक्कमही वाचली नाही. पण, नितू सुरतन यांना धक्का बसला आहे तो त्यांचा पराभव झाला म्हणून नव्हे. तर, कुटुंबातील व्यक्तिंनीच आपल्याला मते दिली नाहीत याचे फार दु:ख नितू यांना झाले आहे. प्राप्त माहितीनुसार, नितू सुरतन यांच्या कुटुंबात मतदानाचा अधिकार प्राप्त असलेले एकूण ९ लोक आहेत. असे असताना नितू यांना केवळ पाचच मते मिळाली. त्यामुळे नितू यांना आपल्यालाच कुटुंबातील लोकांनी मतं दिली नाहीत हे पाहून प्रचंड दु:ख झाले आणि ते कॅमेऱ्यासमोरच ढसाढसा रडू लागले.

दरम्यान, एका पत्रकाराने नितू यांची मुलाखत घेतली. या वेळी प्रतिक्रिया देताना त्यांनी सांगितले की, इव्हीएममध्ये फेरफार झाल्यामुळेच आपला पराभव झाला, असा आरोप केला. दरम्यान, आपल्या कुटुंबीयांनीच आपल्याला मतं दिली नाहीत तर, तुम्ही कसे विजयी होणार असा सवाल पत्रकाराने केला. या प्रश्नाला उत्तर देण्याऐवजी नितू सुरतन वाला हे थेट रडायलाच लागले.