दिल्ली: भाजपला धक्का, 'आप'ला फायदा; दिल्ली विधानसभा निवडणुकीत जनतेने नाकारले राष्ट्रीय मुद्दे

दिल्ली विधानसभेत सत्ताधारी असलेला आप मात्र या मुद्द्यांवर भाष्य करताना काहीसे अंतर ठेऊन स्थानिक प्रश्नांवर चर्चा करताना दिसला. ज्याचा या पक्षाला फायदाच झाला. सीएए एनआरसी असो वा जम्मू कश्मीरचा विशेषत्वाचा दर्जा काढून घेणारे कलम 370 हटवण्याचा मुद्दा असो हे सर्वच मुद्दे दिल्लीकर जनतेला फारसे रुचले नाहीत.

AAP,BJP | (Photo credit: archived, edited, symbolic images)

Delhi Vidhan Sabha Election Results 2020: विधानसभा निवडणूक आणि लोकसभा निवडणुकीत जनतेला नेमके काय हवे असते याची प्रचिती दिल्ली विधानसभा निवडणूक 2020 (Delhi Assembly Election 2020) नंतर पुन्हा एकदा आली आहे. महाराष्ट्र (Maharashtra), झारखंड (Jharkhand) आणि तत्पूर्वी राजस्थान (Rajasthan) , मध्य प्रदेश (Madhya Pradesh) आदी राज्यांनंतर राजकीय पक्षांना निवडणूक प्रचारात वापरण्याच्या मुद्द्यांची आलेली ही दुसरी प्रचिती. अलिकडील जवळपास सर्वच विधानसभा निवडणुकांमध्ये जनतेने राष्ट्रीय मुद्द्यांना साफ.. साफ.. नाकारलेले पाहायला मिळाले. ज्या पक्षांनी स्थानिक मुद्द्यांवर निवडणूक लढवली त्या राजकीय पक्षांना विधानसभा आणि त्या खालोखाल येणाऱ्या जवळपास सर्वच निवडणुकांत यश मिळाले. ज्यांनी स्थानिक किंवा प्रादेशिक निवडणुकांत राष्ट्रीय मुद्द्यांचा आधार घेतला त्यांना फटका बसला. याचे उल्लेखनीय उदाहरण म्हणजे भारतीय जनता पक्ष. दिल्ली विधानसभा निवडणुकीतसुद्धा हेच पाहायला मिळाले. सीएए, एनआरसी, कलम 370 , भारत-पाकिस्तान संबंध, हिंदू-मुस्लीम, नागरिकता यांसारख्या अनेक मुद्द्यांचा वापर खास करुन भाजपकडून करण्यात आला. परंतू, या मुद्द्यांचा विशेष फायदा भाजपला होताना दिसला नाही. त्याउलट सत्ताधारी आम आदमी पक्ष शिक्षण, आरोग्य, विज, परिवहन असे अनेक मुद्दे घेऊन जनते समोर गेला त्याचा आपला फायदा होताना दिसला.

सीएए, एनआरसी

दिल्ली विधानसभा निवडणुकीत नागरिकत्व दुरुस्ती कायदा (CAA) आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणी (National Register of Citizens) हे दोन्ही मुद्दे प्रभावीपणे चर्चेत आले. सत्ताधारी भाजप या मुद्द्यांचे जोरदार समर्थन करताना तर विरोधात असलेला काँग्रेस या मुद्यांना तीव्र विरोध करत असल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, दिल्ली विधानसभेत सत्ताधारी असलेला आप मात्र या मुद्द्यांवर भाष्य करताना काहीसे अंतर ठेऊन स्थानिक प्रश्नांवर चर्चा करताना दिसला. ज्याचा या पक्षाला फायदाच झाला. नाही म्हणायला आपनेही सीएए आणि एनआरसीवर चर्चा केली परंतू ती एका मर्यादेत. दरम्यान, सीएए एनआरसी असो वा जम्मू कश्मीरचा विशेषत्वाचा दर्जा काढून घेणारे कलम 370 हटवण्याचा मुद्दा असो हे सर्वच मुद्दे दिल्लीकर जनतेला फारसे रुचले नाहीत.

शाहीन बाग

दिल्ली विधानसभा निवडणुकीत शाहीन बाह हा मुद्दा सर्वप्रथम भारतीय जनता पक्षाने उपस्थित केला. या मुद्द्यावरुन भाजपने आपला घेरण्याचा जोरदार प्रयत्न केला. त्यानंतर भाजपचा प्रत्येक नेता आपने या वषयावर प्रतिक्रिया द्यावी असे आव्हान करत होता. मात्र, आम आदमी पक्षाने सुरुवातीला या मुद्द्यावर ना कोणते भाष्य केले ना कोणती प्रतिक्रिया दिली. मात्र, जेव्हा शाहीनबाग हा संयोग नव्हे प्रयोग आहे, असे जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका प्रचारसभेदरम्यान म्हटले तेव्हापासून हा मुद्द्या जोरदार चर्चेत आला. (हेही वाचा, Delhi Assembly Election Results 2020 Live Updates: दिल्ली विधानसभा निवडणूक निकालावर भाजपा प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी यांची प्रतिक्रिया; भाजपाच्या विजयाबद्दल आशादायी)

देश के गद्दारोंको.....

सीएए, एनआरसी या मुद्द्यांसह देशभक्तीचा मुद्दाही जोरदार चर्चेत आला. भाजप खासदार अनुराग ठाकूर यांनी तर 'देश के गद्दारोंको... *** मारो.. ** को' अशी घोषणाच दिली. देशभक्तीच्या मुद्द्याला अशा प्रकारे विधानसभा निवडणूक प्रचारात जोडणे हे सर्वसामान्य जनतेला फारसे आवडलेले दिसले नाही. एकूणच काय तर, प्रादेशिक निवडणुकांमध्ये राष्ट्रीय मुद्देय फारसे प्रभावी दिसले नाहीत.

दरम्यान, लोकसभा, विधानसभा, महापालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समिती असो किंवा ग्रामपंचायत निवडणुकांचे त्या त्या पातळीवर एक महत्त्व असतं. त्या निवडणुकांचा परीघ आणि व्याप्तीही ठरलेली असते. त्यामुळे त्या त्या निवडणुकांमध्ये प्रचारावेळी तशाच मुद्द्यांवर चर्चा आणि भाष्य करणे आवश्यक असते. जसे की, लोकसभा-राष्ट्रीय मुद्दे, विधानसभा-प्रादेशिक मुद्दे, जिल्हा परिषद, पंचायत समिती, महापालिका, ग्रामपंचायत आदी निवडणुकांमध्ये स्थानिक मुद्दे चर्चेला यायला हवेत. सर्वसामान्य जनतेलाही तसेच वाटत असल्याचे पुन्हा एकदा दिल्ली विधानसभा निवडणूक निकाल पाहिल्यानंतर दिसत आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now