नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीला आलेल्या पाहुण्यांना मिळणार या पंचपक्वानांची मेजवानी

शपथविधीला आलेल्या पाहुण्यांचा खाण्याचा मेन्यू:

Modi Oath Ceremony Menu(Photo credits: Pixabay,IANS)

ज्या क्षणाची संपूर्ण देश आतुरतेने वाट पाहात असा नरेंद्र मोदींचा (Narendra Modi) शपथविधी सोहळ्याला अवघ्या काही तासांचाच अवधी उरलाय. या सोहळ्यासाठी कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तसेच देश-विदेशातून आलेल्या पाहुण्यांचा योग्य तो पाहुणाचार केला जावा यासाठी विशेष तयारी केली जात आहे. ज्यात महत्त्वाचे म्हणजे त्यांना दिले जाणारे पदार्थ. जर पाहुण्यांच्या सुरक्षेची एवढी काळजी घेतली जात आहे, तर त्यांच्या खाण्यापिण्याची विशेष सोय केली जाईल हे वेगवेगळे सांगण्याची गरज नाही. चला तर मग जाणून घेऊया कसा असेल शपथविधीला आलेल्या पाहुण्यांचा खाण्याचा मेन्यू:

नाश्ता:

शपथविधी साठी आलेल्या 8000 पाहुण्यांना अगदी भारतीय पद्धतीचा नाश्ता ठेवण्यात आला आहे. ज्यात सँडविच, समोसा, राजभोग पासून लेमन टार्टचाही समावेश असेल.

रात्रीचे जेवण:

जेवण शाकाहारी आणि मांसाहारी हे दोन्ही प्रकारचे असतील. हे सर्व जेवण राष्ट्रपती भवनातील स्वयंपाकगृहातूनच बनवले जाणार आहे. रात्री 9 वाजता सर्वांना जेवण दिले जाईल. ह्या जेवणात पाहुण्यांचे स्वागत कोरिएंडर सूप ने केले जाईल. तसेच जेवणात राष्ट्रपती भवनातील सर्वात खास डिश 'दाल रायसीना' दिले जाईल. ज्याला बनविण्यासाठी तब्बल 48 तासांपेक्षा जास्त वेळ लागतो.

ही डाळ आपल्या घरी आईने बनवलेल्या डाळीसारखीच असते, मात्र ही डाळ शिजायला खूप वेळ लागतो. आणि याचा स्वाद हा खूपच अप्रतिम असतो.

ही पदार्थ्यांची यादी आपल्याला आश्चर्यचकित करणारी आहे. असे हे अफलातून

बनवणार आहे शेफ Machindra Kasture. Machindra Kasture Le Club des Chefs चे सदस्य आहेत. हा क्लब देशातील दिग्गज व्यक्तींचे जेवण बनविण्यासाठी म्हणून ओळखला जातो. यात देश-परदेशातील अनेक नामवंत अशा शेफ चा समावेश आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif