नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधानपदी विराजमान व्हावेत ही 'मुलायम सिंग यादव' यांची इच्छा, लोकसभेत खुलेआम दिल्या शुभेच्छा
तसेच सध्या जे खासदार आहेत ते पुन्हा निवडून आले यावेत. असं वक्तव्य केलं आहे.
लोकसभेमध्ये आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यावर समाजवादी पक्षाचे नेता मुलायम सिंग यादव (Mulayam Singh Yadav) यांच्याकडून स्तुतिसुमनं उधळण्यात आली आहे. जसजशी आगामी लोकसभा निवडणूक जवळ येत आहे तशी राजकीय रणधुमाळी रंगायला सुरूवात झाली आहे. पण आज आज संसदेच्या शेवटच्या दिवशी मुलायम सिंग यांना सभागृहात बोलण्याची संधी मिळाल्यानंतर चित्र काही वेगळंचं होतं. मुलायम सिंग यादव यांनी चक्क नरेंद्र मोदी पुन्हा निवडून येतील अणि माझी अशी इच्छा आहे की त्यांनी पुन्हा पंतप्रधानपद सांभाळावं. तसेच सध्या जे खासदार आहेत ते पुन्हा निवडून आले यावेत. असं वक्तव्य केलं.
मुलायम सिंग जेव्हा नरेंद्र मोदींबाबत बोलत होते तेव्हा मोदी सभागृहामध्ये हजर होते. त्यांनी हसून या गोष्टीचा स्वीकार केला. सत्ताधारी पक्षातील लोकांनी डेस्क वाजवून मुलायम सिंग यांच्या वक्तव्याचं स्वागत केलं. मुलायम सिंग बोलत असताना त्यांच्या बाजूच्या सीटवर सोनिया गांधी बसल्या होत्या.
उत्तर प्रदेशमध्ये मुलायम सिंग यांचा मुलगा अखिलेश यादव भाजपाची सत्ता उलथून लावण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्यांना मायावती यांची येथील साथ मिळाली आहे. आता मुलायम सिंग यांच्या वक्तव्यामुळे सपा आणि बसपा यांची युती अडचणीत येण्याची शक्यता आहे.