मोदी सरकारकडून शेतकऱ्यांना दिवाळी गिफ्ट, रब्बी पिकांच्या हमीभावात 85 रुपयांची वाढ

तर केंद्र सरकारकडून गहू,हरभरा, सातू, मोहरी यांसारख्या रब्बी पिकांच्या हमीभावात 85 रुपयांची वाढ करण्यात आली आहे.

Income of farmers | (Photo courtesy: Archived, Edited Images)

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या सरकारने शेतकऱ्यांना दिवाळी गिफ्ट दिले आहे. तर केंद्र सरकारकडून गहू,हरभरा, सातू, मोहरी यांसारख्या रब्बी पिकांच्या हमीभावात 85 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. याबाबत केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.

केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीत प्रमुख रब्बी पिकांच्या किमान आधारभूत किमतींमध्ये वाढ करण्याचा निर्णयाला मंजूरी मिळाली आहे. या निर्णयामुळे देशतभरातील अनेक शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. तर कृषी खर्च आणि किंमत आयोगाने दिलेल्या शिफारसीनुसार शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढीला चालना देण्यासाठी मोदी सरकारकडून रब्बी पिकांच्या आधारभूत किंमतीत वाढ करण्यात आली आहे.(पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना: घरबसल्या पाहा तुम्हाला मिळणार का 6,000 रुपये?)

Tweet:

तर फेब्रुवारी महिन्यात सादर झालेल्या अर्थसंकल्पात मोदी सरकारने 2 सेक्टर जमिन असलेल्या शेतकऱ्यांना प्रतिवर्षी 6 हजार रुपे बँक खात्यात जमा होणार असल्याचा निर्णय घेतला होता. या योजनेमुळे 12 करोड शेतकऱ्यांच्या परिवाराला फायदा होणार आहे. मात्र मोदी सरकारच्या यो योजनेसाठी 75 हजार करोड रुपयांचा संपूर्ण खर्च सकारकडून केला जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते.



संबंधित बातम्या