माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांची SPG सुरक्षा हटवली; झेड प्लस सुरक्षा मात्र कायम
ज्यात काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांचा समावेश आहे. हल्ल्याचा धोका पाहून पंतप्रधानांच्या कुटुंबीयांनाही सुक्षा देण्याची तरतूद आहे
माजी पंतप्रधान मनमोहन सिंह (Manmohan Singh) यांची एसपीजी सुरक्षा (Special Protection Group) काढून घेण्यात आली आहे. त्यामुळे आता त्यांना केवळ झेड प्लस सुरक्षा (Z+ Security) कायम राहणार आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे या निर्णयाची माहिती दिली. मंत्रालयाने म्हटले आहे की, ठराविक काळानंतर सुरक्षेचा आढावा केला जातो. त्यानुसार आवश्यकता असेल तरच सुरक्षा वाढवली जाते किंवा कायम ठेवली जाते. ही एक सामान्य प्रक्रिया आहे.
मनमोहन सिंह यांना यापुढे झेड प्लस सुरक्षा दिली जाणार आहे. आतापर्यंत त्यांना एसपीजी सुरक्षा दिली जात होती. गृहमंत्रालयाने म्हटले आहे की, नेत्यांना आणि व्यक्तिंना दिल्या जाणाऱ्या सुरेक्षेचा आढावा घेणे ही नेहमीची प्रक्रिया आहे. या प्रक्रियेत संबंधित नेत्यांना सुरक्षेची किती आवश्यकता आहे. त्यांच्यावरील धोका टळला आहे का? याचा आढावा घेऊन ही सुरक्षा पुढे कायम ठेवायची की नाही याचा निर्णय घेतला जातो.
दरम्यान, आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह SPG सुरक्षा केवळ 4 लोकांनाच आहे. ज्यात काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांचा समावेश आहे. हल्ल्याचा धोका पाहून पंतप्रधानांच्या कुटुंबीयांनाही सुक्षा देण्याची तरतूद आहे. (हेही वाचा, सरकारचा मोठा निर्णय: जम्मू-काश्मीरमधील पाच फुटीरतावादी नेत्यांची सुरक्षा काढली; सरकारी सुविधा बंद)
एएनआय ट्विट
दरम्यान, दोन दशकांपूर्वी माजी पंतप्रधानांची सुरक्षाही हटविण्यात आली होती. माजी पंतप्रधान एच डी देवेगौडा आणि व्ही पी सिंह यांचीही सुरक्षा पदावरुन पायउतार झाल्यानंतर काही काळाने हटविण्यात होती. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी हे आपल्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे प्रदीर्घ काळ सार्वजनिक जीवनापासून दूर होते. मात्र, त्यांना 2018 पर्यंत झेड प्लस सुरक्षा कायम होती. तर, पंतप्रधान मनमोहन सिंह यांचा कार्यकाळ संपल्यानंतर त्यांच्या मुलीची सुरक्षा काढून घेण्यात आली होती.