Mayawati On UP Election: यूपीतील पराभवावर मायावती यांची प्रतिक्रिया, म्हणाल्या - मुस्लिमांनी सपावर विश्वास ठेवुन केली मोठी चूक

मायावती म्हणाल्या, मुस्लिमांनी सपावर विश्वास ठेवून मोठी चूक केली आहे.

BSP Mayawati (Photo Credit - Twitter)

भारतातील सगळया मोठा लोकसंख्या असलेल्या उत्तर प्रदेशात (UP) भाजपाने (BJP) प्रंचड बहुमताने जागा जिंकुन इतिहास रचला आहे. या निवडणुकीत (UP Election Result 2022) भाजप आघाडीला 273 जागा मिळाल्या असून बहुमतासाठी 202 जागांची गरज आहे. तर 125 जागा समाजवादी पक्ष (SP) आघाडीच्या खात्यात गेल्या आहेत. मोठी गोष्ट म्हणजे मायावतींचा पक्ष बहुजन समाज पक्ष (BSP) या निवडणुकीत केवळ एक जागा काबीज करू शकला आहे. तर दोन जागा काँग्रेसच्या खात्यात गेल्या. बसपाच्या या पराभवावर आता मायावती (Mayawati) यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. मायावती म्हणाल्या, मुस्लिमांनी सपावर विश्वास ठेवून मोठी चूक केली आहे. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत बसपाच्या अपेक्षेविरुद्ध आलेल्या निकालाने पक्षाच्या लोकांनी निराश होऊ नये, असे मायावती पत्रकार परिषदेत म्हणाल्या. योग्य कारणे समजून घेऊन आणि धडा शिकून, आपल्याला आपला पक्ष पुढे घेऊन पुढे घेवुन जाऊन सत्तेवर यायचे आहे.

Tweet

'सपा'ही भाजपची बी टीम

मायावती म्हणाल्या, मुस्लिम समाजाने बसपच्या प्रयत्नांपेक्षा सपावर विश्वास ठेवण्याची मोठी चूक वारंवार केली आहे. त्यांनी सपाला भाजपची बी टीम म्हटले. मायावती म्हणाल्या की, मी बसपच्या सर्व लहान-मोठ्या पदाधिकारी आणि लोकांचे आभार मानते, ज्यांनी मनापासून काम केले. बसपचा आलेख घसरला असून ही आपल्यासाठी चिंतेची बाब असल्याचे मायावतींनी मान्य केले. (हे ही वाचा Akhilesh Yadav on UP Election Results: उत्तर प्रदेश निवडणूक निकालावर समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांची प्रतिक्रिया)

Tweet

विधानसभा 2017 पूर्वी उत्तर प्रदेशात भाजपची फारशी भागीदारी नव्हती. त्याचप्रमाणे आज काँग्रेस देखील भाजपच्याच टप्प्यातून जात आहे. त्यामुळे उत्तर प्रदेश निवडणुकीचा निकाल हा आपल्यासाठी प्रयत्न सुरू ठेवण्याचा धडा आहे, असे मायावती यांनी म्हटले आहे.