मनमोहन सिंग यांची राजस्थान मधून काँग्रेसच्या तिकिटावर राज्यसभा सदस्यपदी बिनविरोध निवड

माजी पंतप्रधान व काँग्रेसचे वरिष्ठ नेते मनमोहन सिंह यांची राज्यस्थान काँग्रेसच्या तिकिटावर राज्यसभा सदस्य पदी बिनविरोध निवड झाली आहे. आज, 19 ऑगस्टला त्यांना जयपूर मध्ये एक सदस्यपदाचे प्रमाण पत्र प्रदान करण्यात येणार आहे.

Former PM Dr Manmohan Singh | File image | (Photo Credits: IANS)

माजी पंतप्रधान (Ex- Prime Minister) व काँग्रेस (Congress) चे वरिष्ठ नेते मनमोहन सिंह (Manmohan Singh)  यांची राज्यस्थान (Rajasthan) काँग्रेसच्या तिकिटावर राज्यसभा (Rajya Sabha) सदस्य पदी बिनविरोध निवड झाली आहे. भारतीय जनता पक्षाचे (BJP) राजस्थान मधील निवडून आलेले राज्यसभा सदस्य मदनलाल सैनी यांच्या आकस्मिक निधनानंतर मनमोहन सिंह यांनी मंगळवारी आपले नामांकन पत्र भरले होते. यावेळी अशोक गेहलोत (Ashok Gehlot)  व सचिन पायलट (Sachin Pilot)  व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अविनाश पांडे (Avinash Pande) हे देखील उपस्थितीत होते. रविवारी म्हणजेच १८ ऑगस्टला पोटनिवडणूक पार पडल्यावर सिंह यांची सदस्यपदी नेमणूक करण्यात आली. आज त्यांना जयपूर मध्ये एक सदस्यपदाचे प्रमाण पत्र प्रदान करण्यात येणार आहे. यानंतर राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी मनमोहन यांचे अभिनंदन करणारे एक खास ट्विट केले आहे.

अशोक गेहलोत ट्विट

दरम्यान, आश्चर्याची गोष्ट ही कि मनमोहन सिंह यांच्या नेमणुकीबद्दल भाजप किंवा अन्य मित्रपक्षांनी देखील विरोध केला नाही, याउलट मनमोहन सिंह यांच्या विरुद्ध कोणीही उमेदवार या पदासाठी उभा नसल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली.The Accidental Prime Minister सिनेमावरुन अनुपम खेर यांच्यासह 13 जणांविरोधात FIR दाखल करण्याचे आदेश

मनमोहन सिंह हे यापूर्वी सलग तीन दशकांपासून राज्यसभा सदस्य म्हणून आसाम मधून निवडून येत आहेत यंदा १४ जूनला त्यांचा कार्यकाळ संपला होता, त्यानंतर आता त्यांची पुन्हा नेमणूक झाली असून 3 एप्रिल 2014 पर्यंत ते राज्यसभा सदस्य म्हणून कार्यरत असतील. याशिवाय त्यांनी काँग्रेस सत्तेत असताना देशाचे पंतप्रधान व अर्थमंत्री म्हणून देखील कार्यभार सांभाळला आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now