शिवसेनेच्या याचिकेवर तातडीची सुनावणी होणार नाही; राष्ट्रपती राजवट असली तरी सहा महिन्यात केव्हाही बहुमत सिद्ध करता येऊ शकणार

राष्ट्रवादी काँग्रेसला सत्ता स्थापनेचे निमंत्रण दिल्यानंतर मुदत संपण्याआधीच राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू केली. तसेच राज्यात सत्तास्थापनेचा दावा करण्यासाठी राज्यपालांनी वेळ वाढवून न दिल्याने नाराज झालेल्या शिवसेनेने राज्यपालांच्या विरोधात मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

Shiv Sena Chief Uddhav Thackeray | (Photo Credit: You Tube)

शिवसेनेच्या याचिकेवर तातडीची सुनावणी होणार नसून राष्ट्रपती राजवट असली तरी सहा महिन्यात केव्हाही बहुमत सिद्ध करता येऊ शकणार आहे, अशी माहिती समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला सत्ता स्थापनेचे निमंत्रण दिल्यानंतर मुदत संपण्याआधीच राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू केली. तसेच राज्यात सत्तास्थापनेचा दावा करण्यासाठी राज्यपालांनी वेळ वाढवून न दिल्याने नाराज झालेल्या शिवसेनेने राज्यपालांच्या विरोधात मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. महत्वाचे म्हणजे, कपिल सिब्बल हे शिवसेनेच्या वतीने न्यायालयात बाजू मांडणार आहेत, अशी माहिती अनिल परब यांनी दिली होती. यासंदर्भात सर्वोच्च न्यायालय काय भुमिका घेणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.