सत्तांतर झाले सत्ताग्रहणही पूर्ण; मध्य प्रदेश - कमलनाथ, राजस्थान - अशोक गेहलोत यांनी घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ

दरम्यान,राजस्थानमध्ये अशोक गेहलोत यांनी मुख्यमंत्री पदाची तर, सचिन पायलट यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. छत्तीसगडमध्ये भूपेश बघेल हे मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत.

अशोक गेहलोत, कमलनाथ आणि भूपेश बघेल अनुक्रमे राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडचे मुख्यमंत्री | (Photo courtesy: Archived, Edited Images)

Madhya Pradesh, Rajasthan, Chhattisgarh CMs' oath-taking: मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या तीन राज्यांत आज (सोमवार, 17 डिसेंबर) मुख्यमंत्री पदासाठी शपतविधीचा कार्यक्रम पार पडत आहे. लोकसभा, विधानसभा निवडणुकीत 2014पासून भाजपचा विजयी वारु चौखुर उधळला होता. या वारुला या तीन राज्यांच्या रुपात विजय मिळवत काँग्रेसने पहिल्यांदाच चाप लावला. गेल्या चार, साडेचार वर्षांमध्ये राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने मिळवलेला हा पहिलाच मोठा विजय आहे. मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड या तिन्ही राज्यांत अनुक्रमे कमलनाथ (Kamal Nath), अशोक गेहलोत (Ashok Gehlot) आणि भूपेश बघेल (Bhupesh Baghel) यांच्या नावावर मुख्यमंत्री पदासाठी काँग्रेस नेतृत्वाने शिक्कामोर्तब केले आहे. दरम्यान,राजस्थानमध्ये अशोक गेहलोत यांनी मुख्यमंत्री पदाची तर, सचिन पायलट यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. चालून आलेली संधी आणि विजयाचा जल्लोष या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून मोठे शक्तीप्रदर्शन केले जाण्याची शक्यता आहे.

राजस्थान

राजस्थानमध्ये अशोक गेहलोत हे मुख्यमंत्री पदाची कमान सांभाळतील. तर, तरुण तडफदार नेते सचिन पायलट हे उपमुख्यमंत्री पदाचा कार्यभार स्वीकारतील. सकाळी 1.30 वाजता हा कार्यक्रम अलबर्ट हॉलमध्ये पार पडला. राज्यपाल कल्याण सिंह यांचेकडून अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांनी पद आणि गोपनियतेची शपथ घेतली. गेहलोत यांची राजस्थानचे मुख्यमंत्री होण्याची ही तिसरी वेळ आहे. या आधी 1098 आणि 2008मध्ये गेहलोत यांनी राजस्थानचे मुख्यमंत्रीपद भूषवले आहे. तर, सचिन पायलट पहिल्यांदाच मुख्यमंत्री होत आहेत. ते राजस्थान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत. तसेच, या आधी ते लोकसभा सदस्य होते. तसेच, मनमोहन सिंह सरकारमध्ये मंत्रीही होते. काँग्रेसचे दिवंगत नेते राजेश पायलट यांचे ते पूत्र आहेत.

मध्य प्रदेश

गेली 15 वर्षे सत्तेत असलेल्या भाजप प्रणीत शिवराजसिंह चौहाण सरकारला बाहेरचा रस्ता दाखवत काँग्रेसने जोरदार मुसंडी मारली. येथे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कमलनाथ यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. भोपाळच्या जंबुरी मैदानावर दुपारी 2.30 वाजता हा कार्यक्रम पार पडला. कमलनाथ यांनी राज्यपाल आनंदिबेन पटेल यांच्याकडून मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. या शपथविधी सोहळ्यास काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, माजी पंतप्रधान मनमोहनसिंह, खासदार ज्योतिराधित्य सिंधिया, लोकसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे, राजीव शुक्ला, कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्दारमैय्या, मंत्री डी शिवकुमार, पुडुचेरीचे मुख्यमंत्री नारायणसामी, राजस्थानचे नवे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, उप-मुख्यमंत्री सचिन पायलट, आनंद शर्मा, राज बब्बर, हरियाणाचे मुख्यमंत्री भूपेंद्र हुड्डा, माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह, पंजाबचे मंत्री नवज्योतसिंह सिद्धू, विवेक तन्खा आदी मंडळी उपस्थीत होती. (हेही वाचा, मावळत्या मुख्यमंत्र्यांचा राजीनामा; हे आहेत तीन राज्यांच्या मुख्यमंत्रीपदाचे दावेदार)

छत्तीसगड

तिकडे छत्तीसगडमध्ये काँग्रेस नेते भूपेश बघेल हे मुख्यमंत्री पदाची शपथ घेत आहेत. आज सायंकाळी 4.30वाजता बघेल हे पद आणि गोपनियतेची शपथ घेतील. या कार्यक्रमाला काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासह महाआघाडीतील दिग्गज नेते उपस्थित राहण्याची शक्यता आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif