Madhya Pradesh Assembly Elections 2018: मध्यप्रदेशात निकालापूर्वीच Congress Party मधील कमलनाथ यांची समर्थकांकडून CM पदाची घोषणा
Madhya Pradesh Assembly Elections 2018 Exit Poll: मध्य प्रदेशात झालेल्या विधानसभा निवडणूकीचा निकाल 11 डिसेंबर रोजी मंगळवारी येणार आहे.
Madhya Pradesh Assembly Elections 2018 : मध्य प्रदेशात झालेल्या विधानसभा निवडणूकीचा निकाल 11 डिसेंबर रोजी मंगळवारी येणार आहे. परंतु काँग्रेस (Congress Party) पक्षातील कमल नाथ (Kamal Nath) यांच्या समर्थकांनी त्यांना मुख्यमंत्री पदासाठी पात्र असल्याचे घोषित केले आहे.
काँग्रेस पक्षातील कमलनाथ यांना त्यांच्या समर्थकांनी विधानसभेच्या निकालापूर्वीच मुख्यमंत्री (CM) घोषित केले आहे. या बद्दल कमल नाथ यांना विचारले असता त्यांनी मंगळवारच्या दिवसाची वाट पाहा, निकाल तुमच्या समोर असेल. तर पक्ष 140 जागांवर जिंकणार असल्याचा ही दावा त्यांच्याकडून केला जात आहे. मात्र कमल नाथ यांनी केलेले विधान काही असो, परंतु त्यांच्या समर्थकांनी त्यांना मुख्यमंत्री मानले आहे. एवढच नसून कमलनाथ यांचे पोस्टर सुद्धा भोपालमध्ये समर्थकांकडून लावण्यात आले आहे.
सोमवारी कमल नाथ त्यांच्या कार्यालयात पोहचले त्यावेळी समर्थकांनी त्यांच्या नावाने घोषणा करण्यास सुरुवात केली. तसेच 'प्रदेशाचा मुख्यमंत्री कसा असेल, कोण असेल- कमल नाथ असणार' अशा घोषणा केल्या. तर मध्य प्रदेशात काँग्रेस पक्षातील दोन प्रमुख उमेदवार कमल नाथ आणि सिंधिया यांनी मुख्यमंत्री पद मिळवण्यासाठी जोरदार प्रचार केला आहे.