माढा लोकसभा मतदारसंघ: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संजय शिंदे विरुद्ध भाजपचे रणजितसिंह नाईक निंबाळकर काट्याची टक्कर
माढा लोकसभा मतारसंघातून 2009 ते 2014 या काळात शरद पवार यांनी प्रतिनिधित्व केले आहे. तर, त्यानंतर 2014 ते 2019 या काळात विजयसिंह मोहिते पाटील हे येथून विद्यमान खासदार आहेत. मात्र, लोकसभा निडणूक 2019 च्या तोंडावर खा. विजयसिंह मोहिते पाटील यांचे चिरंजीव रणजितसिंह मोहिते पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि मतदारसंघातील राजकारणाला मोठी कलाटणी मिळाली.
Lok Sabha Elections 2019: राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawa) यांच्या उमेदवारीची घोषणा आणि त्यानंतर धक्कादायक माघार यामुळे चर्चेत आलेल्या माढा लोकसभा मतदारसंघाकडे उभ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. सातारा (Satara) आणि सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघांचा मिळून बनलेला हा मतदारसंघ. येथून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संजय शिंदे (Sanjay Shinde) आणि भाजप (BJP) उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर (Ranjit Naik-Nimbalkar) यांच्यात जोरदार चुरस आहे. लोकसभा निवडणूक 2019 च्या तोंडावर या मतदारसंघात आश्चर्यकारक घडामोडी घडल्या. त्यामुळे मतदारांचा कौल कुणाला याबाबत या मतदारसंघात जोरदार चर्चा सुरु आहे. वंचित बहुजन आघाडी (Vanchit Bahujan Aghadi) उमेदवार विजय मोहे हे देखील माढा येथून नशिब आजमावत आहेत.
या मतारसंघातून 2009 ते 2014 या काळात शरद पवार यांनी प्रतिनिधित्व केले आहे. तर, त्यानंतर 2014 ते 2019 या काळात विजयसिंह मोहिते पाटील हे येथून विद्यमान खासदार आहेत. मात्र, लोकसभा निडणूक 2019 च्या तोंडावर खा. विजयसिंह मोहिते पाटील यांचे चिरंजीव रणजितसिंह मोहिते पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि मतदारसंघातील राजकारणाला मोठी कलाटणी मिळाली. रणजितसिंह मोहिते पाटील यांना भलेही उमेदवारी मिळाली नाही. परंतू, राष्ट्रवादीच्या विरोधात भाजपची ताकद वाढण्यासाठी या मतदारसंघात मात्र मदत झाली. मोहिते पाटील आणि भाजप यांच्यात आयत्या वेळी काहीतरी खेडी होणार. हे ध्यानात घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसने संजय (मामा) शिंदे यांच्या रुपात भाजप पुरस्करत जिल्हा परिषद अध्यक्ष राष्ट्रवादीत दाखल करुन घेतला आणि त्यांना उमेदवारीही दिली.
दरम्यान, 2014 च्या निवडणुकीत काँग्रेस विरोधी लाट असतानाही विजयसिंह मोहिते पाटील यांनी आपला गढ शाबूत राखला होता. त्यावेळी (2014) विजयसिंह मोहिते पाटील विरुद्ध स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते सदाभाऊ खोत असा सामना रंगला होता. या निवडणुकीत विजयसिंह मोहिते पाटील यांना 4 लाख 89 हजार 989 तर विरोधात असलेल्या सदाभाऊ खोत यांना 4 लाख 64 हजार 645 इतकी मते मिळाली होती. काटावरच्या मताधिक्याने (25 हजार 344 मते) विजयसिंह विजयी झाले होते. (हेही वाचा, महाराष्ट्राचे राजकारण ढवळून टाकणारे बहुचर्चीत लोकसभा मतदारसंघ आणि लक्ष्यवेधी लढती)

दरम्यान, या वेळी सदाभाऊ खेत आणि विजयसिंह मोहिते-पाटील एकाच गोटात आहेत. त्यामुळे राजकीय लढाईला रंगत आली असून, हा सामना राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संजय शिंदे विरुद्ध भाजपचेच रणजितसिंह नाईक निंबाळकर असा रंगला आहे. मतदारांच्या मनात काय हे प्रत्यक्ष मतमोजणीदिवशीच कळणार आहे.
(The above story first appeared on LatestLY on Apr 22, 2019 03:41 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

