Loksabha Elections 2019: काँग्रेस पक्षाची आठवी उमेदवार यादी जाहीर; चार माजी मुख्यमंत्र्यांना उतरवले रिंगणात

ज्या जागांवरील उमेदवार अद्यपा जाहीर झाले नाहीत. त्या जागांवरील उमेदवार निवडीचे काम अंतीम टप्प्यात आले आहे.

Ashok Chavan,Digvijaya Singh, Veerappa Moily, Harish Rawat | (Photo courtesy: archived, edited, symbolic images)

Loksabha Elections 2019: लोकसभा निवडणूक 2019 साठी काँग्रेस (Congress ) पक्षाने आपल्या 38 उमेदवारांची आठवी यादी शनिवारी रात्री उशीरा जाहीर केली. यात महाराष्ट्र (Maharashtra), कर्नाटक, मणिपूर आणि उत्तराखंड या राज्यांच्या उमेदवारांच्या नावाचा समावेश आहे. विशेष असे की, काँग्रेसने पुन्हा एकदा विविध राज्यांच्या चार माजी मुख्यमंत्र्यांना लोकसभेसाठी निवडणूक रिंगणात उतरवले आहे. यात महाराष्ट्रातून अशोक चव्हाण (Ashok Chavhan) , उत्तराखंड येथून हरीश रावत, मध्य प्रदेश दिग्विजय सिंह, आणि कर्नाटक येथून वीरप्पा मोईली या चार माजी मुख्यमंत्र्यांचा समावेश आहे.

काँग्रेसचे चार माजी मुख्यमंत्री कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढवणार?

काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री आणि ते निवडणूक लढवत असलेले लोकसभा मतदारसंघ
राज्य उमेदवाराचे नाव लोकसभा मतदारसंघाचे नाव
महाराष्ट्र अशोख चव्हाण नांदेड लोकसभा मतदारसंघ
कर्नाटक वीरप्पा मोईली चिक्काबल्लापूर लोकसभा मतदारसंग
मध्य प्रदेश दिग्विजय सिंह भोपाळ लोकसभा मतदारसंघ
उत्तराखंड हरीश रावत  नेनीताल-उधमसिंहनगर लोकसभा मतदारसंघ

आठव्या यादीनुसार काँग्रेस पक्षाचे राज्यनिहाय उमेदवार

महाराष्ट्र :

नांदेड - अशोक चव्हाण

एएनआय ट्विट

कर्नाटक :

चिकोडी- प्रकाश हुक्केरी, बेळगाव- विरुपाक्षी एस. सिधुन्नावर, बागलकोट- वीणा कशप्पानवर, गुलबर्गा- मल्लिकार्जुन खरगे, रायचूर- बी. व्ही. नायक, बिदर- ईश्वर खंडारे बी., कोप्पल- राजशेखर हितनल, बेल्लारी- यू. एस. उगरप्पा, हवेरी- डी. आर. पाटील, दवनागेरे - शामनूर शिवशंकरप्पा, दक्षिण कन्नड- मिथुन राय, चित्रदुर्ग- बी. एन. चंद्राप्पा, म्हैसूर- विजयशंकर, चामराजनगर- आर. ध्रुव नारायण, बंगळूर (ग्रामीण)- डी. के. सुरेश, बंगळुरू-मध्य -रिझवान अर्शद, चिकबल्लापूर - डॉ. एम. वीरप्पा मोईली, कोलार- के. एच. मुनियप्पा.

मध्यप्रदेश:

टिकमगढ-किरण अहिरवार, खजुराहो- कविता सिंग, शाहडोल- प्रमिला सिंग, बालाघाट- मधू भगत, होशंगाबाद- शैलेंद्र दिवाण, भोपाळ- दिग्विजयसिंह, मंदसौर- मीनाक्षी नटराजन, रतलाम- कांतिलाल भुरिया, बेतुल- रामू टेकम. (हेही वाचा, Loksabha Elections 2019: भाजप उमेदवारांची दुसरी यादी जाहीर, महाराष्ट्रात चार विद्यमान खासदारांना पक्षश्रेष्ठींचा दणका)

मणिपूर :

इन्नर मणिपूर- ओ. नवकिशोर सिंग, आऊटर मणिपूर- के. जेम्स.

उत्तराखंड :

टेहरी गढवाल- प्रितम सिंग, गढवाल- मनीष खंडुरी, अलमोरा- प्रदीप टामटा, नैनिताल उधमसिंगनगर- हरीश रावत, हरिद्वार- अंबरीश कुमार.

उत्तर प्रदेश :

अमरोहा- राशीद अल्वी, मथुरा- महेश पाठक, ओनला- कुंवर सर्वराज सिंग.

दरम्यान, निवडणू अर्ज भरण्याची वेळ जवळ येऊन ठेपल्याने जवळपास सर्वच राजकीय पक्षांनी आपापले उमेदवार जाहीर केले आहेत. ज्या जागांवरील उमेदवार अद्यपा जाहीर झाले नाहीत. त्या जागांवरील उमेदवार निवडीचे काम अंतीम टप्प्यात आले आहे.