Lok Sabha Elections 2024: लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातल्या 102 मतदारसंघातील मतदानाबाबतची अधिसूचना आज होणार जारी
रामटेक, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर या लोकसभेच्या मतदारसंघामध्ये 19 एप्रिलला मतदान होणार आहे.
भारतामध्ये लोकसभा निवडणूकीच्या (Loksabha Election) धामधूमीला सुरूवात झाली आहे. यंदा 19 एप्रिल ते 1 जून दरम्यान 7 टप्प्यात मतदान होणार आहेत. या निवडणूकांमध्ये 19 एप्रिलला होणार्या 102 मतदारसंघातील उमेदवारांसाठी आजपासून नॉमिनेशन प्र्क्रिया सुरू होत आहे. 19 एप्रिलला 21 राज्यात आणि केंद्र शासित प्रदेशामध्ये पहिल्या टप्प्यातील मतदान आहे. या टप्प्यासाठी नॉमिनेशन दाखल करण्याची अंतिम तारीख 27 मार्च आहे. बिहार मध्ये सण असल्याने ही अंतिम तारीख 28 मार्च आहे. बिहार मध्ये 40 पैकी 4 ठिकाणी पहिल्या टप्प्यातील मतदान 19 एप्रिलला आहे.
नॉमिनेशन प्रक्रियेनंतर कागदपत्रांची पडताळणी 28 मार्चला केली जाईल. बिहारसाठी ही तारीख 30 मार्च असेल. उमेदवारी मागे घेण्याची तारीख 20 मार्च आहे. दरम्यान महाराष्ट्रातही 19 एप्रिलला मतदान आहे. विदर्भात प्रामुख्याने हे मतदान होणार आहे. त्यामध्ये रामटेक, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर या जागांचा समावेश आहे. नक्की वाचा: Lok Sabha Elections 2024 Schedule: लोकसभा निवडणूक कार्यक्रम जाहीर, आदर्श आचारसंहिता जारी .
पहा ट्वीट
महाराष्ट्रासोबत 19 एप्रिल ला अरूणाचल प्रदेश, आसाम, बिहार, छत्तीसगड, मध्य प्रदेश, राजस्थान, तामिळनाडू, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, जम्मू कश्मीर, लक्षद्वीप आणि पॉन्डिचेरी मध्ये मतदान होणार आहे.