एकाच महिलेला दोन पक्षांकडून तिकीट; काँग्रेस, प्रसपा उमेदवार यादीत झळकले नाव; घटनात्मक पेच पाहून राष्ट्रीय पक्षाची माघार

एकाच उमेदवारावरुन होणारा संभाव्य गोंधळ टाळण्यासाठी काँग्रेसने मग तनुश्री त्रिपाटीचे तिकीट रद्द केले आणि त्या जागी सुप्रिया श्रीनेत (Supriya Srinet) यांना तिकीट दिले. या दोन्ही पक्षांच्या प्रतापामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला एक नवा विषय मिळाला आहे.

Tanushree Tripathi | (Photo Credit: File Photo, Facebook)

Lok Sabha Elections 2019: राजकारणात एकमेकांचे उमेदवार पळवणे, नेते फोडणे, कपट कारस्थानं करणं त्याला रणनिती हे गोंडस नाव देणं या गोष्टी नव्या नाहीत. पण, उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) राज्यात लोकसभा निवडणुकीच्या आखाड्यात घडलेल्या प्रकाराने राजकीय वर्तुळासोबत सर्वांनाच चकीत केले. घडले असे की, लोकसभा निवडणुकीसाठी दोन राजकीय पक्षांनी महाराजगंज लोकसभा निवडणूक मतदारसंघातून एकाच उमेदवाराला तिकीट दिले. तनुश्री त्रिपाठी (Tanushree Tripathi) असे या उमेदवाराचे नाव आहे. होय, काँग्रेस आणि शिवपाल यादव (Shivpal Singh Yadav) यांच्या प्रगतिशील समाजवादी पार्टी (Pragatisheel Samajwadi Party) या दोन्ही पक्षांनी उमेदवार म्हणून तुनश्री त्रिपाटीच्या नावावर शिक्कामोर्तब केले. दोन्ही पक्षांच्या उमेदवार यादीतही तिचे नाव झळकले. दरम्यान, एकाच उमेदवारावरुन होणारा संभाव्य गोंधळ टाळण्यासाठी काँग्रेसने मग तनुश्री त्रिपाटीचे तिकीट रद्द केले आणि त्या जागी सुप्रिया श्रीनेत (Supriya Srinet) यांना तिकीट दिले. या दोन्ही पक्षांच्या प्रतापामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला एक नवा विषय मिळाला आहे.

कोण आहे तनुश्री त्रिपाठी?

तनुश्री त्रिपाठी ही अमरमणि त्रिपाठी यांची कन्या आहे. अमरमणि त्रिपाठी हे उत्तर प्रदेशच्या राजकारणातील बडे नाव आहे. ते काही काळ मंत्रीही होते. सध्या ते तुरुंगात आहेत. कवयत्री मधुमिता हत्याकांड प्रकरणात त्यांना जन्मठेपेची शिक्षा झाली आहे. अमरमणि त्रिपाठी यांचे चिरंजीव अमनमणि हेसुद्धा नैनतवा विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. काँग्रेसने तनुश्रीत्रिपाठी हिला पक्षाचे तिकीट दिले होते. मात्र, शिवपाल यादव यांच्या प्रगतिशील समाजवादी पक्षाकडूनही तनुश्री हिच्या नावाची घोषणा केल्यानंतर काँग्रेसने तनुश्रीचे तिकीट मागे घेतले आणि ते सुप्रिया श्रीनेत यांना दिले.

आई, वडील, भाऊ तुरुंगात म्हणून सोडली नोकरी

तनुश्री हिचा जन्म 11 जानेवारी 1990 मध्ये गोरखपूर येथे झाला. तिने नैनिताल येथील सेंट मेरी कॉन्वेंट स्कूल येथून शिक्षण घेतले आहे. त्यानंतर पुढील शिक्षणासाठी त्या लंडन येथे गेल्या. सध्या त्या भाऊ अमनमणि आणि पिता अमरमणि त्रिपाठी यांचा राजकीय वारसा पुढे चालवत आहेत. शिक्षण पूर्ण झाल्यावर तिने युकेतील आंतरराष्ट्रीय कंपनीत नोकरी सुरु केली होती. मात्र, 2014 मध्ये कौटुंबीक स्थिती पाहून नोकरी सोडली. त्या वेळी कवयत्री मधुमिता हत्या प्रकरणात वडील, आई आणि भाऊ असे तिघेही तुरुंगात होते. तिचे वडील मधुमिता प्रकरणात तुरुंगात शिक्षा भोगत आहेत. तर, भाऊ अमनमणि पत्नी सारा हिच्या हत्या प्रकरणात तुरुंगात होता. (हेही वाचा, नरेंद्र मोदी यांचे अंध 'भक्त' ओळखण्याच्या काही सोप्या पद्धती!)

Supriya Shrinate | (Photo Credit: File Photo, Facebook)

कोण आहे सुप्रिया श्रीनेत

सुप्रिया श्रीनेत या माजी खासदार हर्षवर्धन यांच्या कन्या आहेत. हर्षवर्धन हे फरेंदा विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या तिकीटावर आमदार म्हणून निवडूण गेले होते. तर, जनता दलाच्या तिकिटावर खासदार म्हणून निवडूण आले होते. त्यानंतर अनेक निवडणुकांमध्ये त्यांचा पराभव झाला. अखेर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. सुप्रिया श्रीनेत यांना शिवपाल यांच्या प्रसपातर्फे लढण्याचा प्रस्ताव होता. हा प्रस्तावर सुप्रिया श्रीनेत यांनी स्वीकारलाही होता. मात्र, प्रत्यक्षात उमेदवार यादी जाहीर झाली तेव्हा महाराजगंज लोकसभा मतदारसंघातून प्रसप उमेदवार यादीत तनुश्री त्रिपाठी यांचे नाव होते.

पत्रकारितेमध्ये करिअर

काँग्रेस उमेदवार सुप्रिया श्रीनेत यांचा जन्म 1977 मध्ये झाला. त्यांनी लखनऊ येथील लॉरेटो कॉन्वेंट येथून प्राथमिक शिक्षण पूर्ण केले. तर, पदवी आणि पदव्यूत्तर शिक्षण दिल्ली विद्यापीठातून पूर्ण केले. राज्यशास्त्र या विषयात एम ए केल्यानंतर त्यांनी एका टीव्ही चॅनलमधून करिअरला सुरुवात केली. गेली 10 वर्षे त्या टीव्ही चॅनलमध्ये उच्च पदावर (संपादक) कार्यरत होत्या. त्यांचे पती खासगी कंपनीत उच्च पदावर कार्यरत आहेत.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now