Lok Sabha Elections 2019: कोणत्याच पक्षाला मिळणार नाही बहुमत, यंदा बनणार NDA चं सरकार, शिवसेनेच्या संजय राऊत यांचा ठाम विश्वास
लोकसभा निवडणुकीचा तिसरा टप्पा सुरु असताना शिवसेना नेते संजय राऊत यांनी यंदा NDA सरकार जिंकून येण्याची अधिक शक्यता आहे अशी भविष्यवाणी करत दर्शवला एनडीएला पाठिंबा
देशभरात सुरु असलेल्या लोकसभेच्या रणसंग्रामाचा (Loksabha Elections) निकाल काय लागणार याबाबद्दल आता पासूनच सर्वांच्या मनात कुतूहल आहे, मात्र शिवसेना (Shivsena) नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी यंदा सरकार तर नॅशनल डेमोक्रेटिक अलायन्स म्हणजे NDA (एनडीए) चेच बनणार असा ठाम विश्वास दर्शवला आहे. सध्याची परिस्थिती पाहता कोणत्याही एका पक्षाला बहुमत मिळेल असे वाटत नाही त्यामुळे एनडीएचं (NDA) सरकार जिंकून येण्याची अधिक शक्यता आहे, आम्ही सगळे एनडीएचे सहयोगी आहोत असंही राऊत यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे.
ANI ट्विट
यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP ) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी देखील महाराष्ट्रात 28 ते 30 जागांवर काँग्रेस, राष्ट्रवादीचे उमेदवार जिंकून येतील असा विश्वास व्यक्त केला होता. महाराष्ट्रात 28 ते 30 जागांवर काँग्रेस, राष्ट्रवादीचे उमेदवार जिंकून येतील: जयंत पाटील
आज, 23 एप्रिलला देशभरातील 15 राज्य आणि काही केंद्रशासित प्रदेश मिळून 117 लोकसभांच्या जागांसाठी मतदान सुरु आहे. यामध्ये महाराष्टातील जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, रायगड , पुणे, बारामती, अहमदनगर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापुर आणि हातकणंगले या 14 जागांचा समावेश आहे.
महाराष्ट्रात या जागांसाठी भारतीय जनता पार्टी-शिवसेना या महायुती विरुद्ध विपक्ष दल कांग्रेस-राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी यांच्यामध्ये जोरदार लढाई पाहायला मिळत आहे. यंदा लोकसभा निवडणूक सात टप्प्यांमध्ये पार पडणार असून 23 मे ला निकाल जाहीर होणार आहेत.