बहीण प्रियंका गांधी यांना बंधू राहुल गांधी देणार गिफ्ट; लोकसभा निवडणुकीत घडणार चमत्कार?
त्यामुळे काँग्रेस आणि नेहरु-गांधी घराण्याचे विरोधक, टीकाकार यांना धक्का बसल्याची चर्चा आहे. दरम्यान, विरोधक या धक्क्यातून अद्याप सावरले नसताना राहुल गांधी बहीण प्रियंका गांधी यांच्यासाठी आणखी एक मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे.
Lok Sabha Elections 2019: नेहरु-गांधी घराण्याचा (Nehru-Gandhi family) आणखी एक वलयांकीत चेहरा प्रियंका गांधी-वड्रा (Priyanka Gandhi) यांनी अखेर सक्रीय राजकारणात प्रवेश केला. राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी योग्य वेळी मोठी खेळी करत राजकारणाच्या पटावर डाव टाकला. त्यामुळे काँग्रेस आणि नेहरु-गांधी घराण्याचे विरोधक, टीकाकार यांना धक्का बसल्याची चर्चा आहे. दरम्यान, विरोधक या धक्क्यातून अद्याप सावरले नसताना राहुल गांधी बहीण प्रियंका गांधी यांच्यासाठी आणखी एक मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. काँग्रेस सूत्रांच्या हवाल्याने प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, राहुल गांधी 2004 पासून लढत असलेला आपला अमेटी लोकसभा मतदारसंघ (Aamethi Lok Sabha Constituency) प्रियंका यांच्यासाठी सोडू शकतात. तसेच, आगामी लोकसभा निवडणुकीसाठी ते छिंदवाडा लोकसभा मतदारसंघातून (Chhindwara Lok Sabha Constituency) निवडणूक लढवू शकतात. काँग्रेस नेत्या सोनिया गांधी रायबरेली (Raebareli) येथून निवडणूक लढवणार असल्याची माहिती आहे. बंधू राहुल यांच्याकडून बहीण प्रियंका यांना मिळणाऱ्या या भेटीबाबत राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
अमेटी मतदारसंघातून काँग्रेस अध्यक्ष सन 2004 पासून लोकसभेवर सलग निवडून आले आहेत. त्यामुळे हा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जातो. तर, दुसऱ्या बाजूला राहुल गांधी हे ज्या छिंदवाडा मतदारसंघातून निवडूक लढवण्याची शक्यता आहे. हा मतदारसंघही काँग्रेसचा बालेकिल्लाच आहे. मध्य प्रदेशचे विद्यमान मुख्यमंत्री कमलनाथ हे या मतदारसंघातून लोकसभेवर तब्बल 8 वेळा निवडून गेले आहेत. कमलनाथ यांनीच राहुल गांधी यांना या मतदारसंघातून लढण्याचा निमंत्रणवजा सल्ला दिला आहे.
दरम्यान, राहुल गांधी हेसुद्धा लवकरच छिंदवाडाला भेट देण्याची शक्यता आहे. सूत्रांनी म्हटले आहे की, राहुल गांधी येथून केवळ उमेदवारी अर्ज भरतील. या मतदारसंघात राहूल गांधी यांच्या प्रचाराची जबाबदारी कमलनाथ आणि त्यांची टीम उचलणार आहे. त्यामुळे राहुल गांधी यांना देशभरात प्रचार करण्यास वेळ मिळणार आहे. (हेही वाचा, 2019 मध्ये महाराष्ट्राचा पंतप्रधान ? राहुल गांधी नांदेड मतदारसंघातून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात? 5 मुद्दे)
राहुल गांधी छिंदवाडा येथून निवडणूक लढले तर, मध्य प्रदेश आणि छत्तीसगढ राज्यांतील 40 लोकसभा मतदारसंघांवर प्रभाव पडू शकतो. तसेस, शेजारीच असलेल्या राजस्थानपर्यंतही हा प्रभाव जाऊ शकतो. त्यामुळे एकूण 65 जागांवर भाजपचा सामना काँग्रेससोबत होईल. या तिन्ही राज्यांमधील बदलती राजकीय समिकरणे पाहता काँग्रेसने या राज्यांमधून कमीत कमी 50 जागा जिंकण्याचे उद्दीष्ट ठेवले आहे.