हिंगोली लोकसभा मतदारसंघ: एकाच नावाचे 6 उमेदवार रिंगणात, विजयाची माळ कोणाच्या गळ्यात? काँग्रेसच्या पंजाला शिवसेनेच्या बाणाचे आव्हान

हिंगोलीमध्ये 28 उमेदवारांपैकी 11 उमेदवार हे पक्ष, संघटना आणि स्थानिक आघाड्यांच्या छत्राखाली निवडणूक लढवत आहेत. तर, उर्वरीत 17 उमेदवार अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत. एकूण उमेदवरांपैकी बसपचे दत्ता मारोती धनवे, काँग्रेसचे सुभाषराव बापूराव वानखेडे, शिवसेनेचे हेमंत पाटील, वंचित बहुजन आघाडीचे मोहन फत्तुसिंग राठोड आदी उमेदवार हे चर्चित आणि मतांच्या राजकारणात प्रभाव टाकरणारे म्हणून ओळकले जात आहेत.

Hingoli Lok Sabha election 2019 | (Photo Credits: File Image)

Lok Sabha Elections 2019: लोकसभा निवडणूक 2014 मध्ये काँग्रेस (Congress) विरोधी लाट आणि भाजप नेते नरेंद्र मोदी (Pm Modi) यांचे प्रभावी प्रचारतंत्र याच्या जोरावर महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाचा धुव्वा उडाला. राज्यात काँग्रेसचे गड समजले जाणारे अनेक बालेकिल्ले बुरुजासकट जमीनदोस्त झाले. असे असतानाही नांदेड (Nanded) आणि हिंगोली लोकसभा मतदारसंघ (Hingoli Lok Sabha Constituency) अपवाद ठरले. नांदेड येथून अशोक चव्हाण (Ashok Chavan) आणि हिंगोली येथून राजीव सातव (Rajiv Satav) काँग्रेस विरोधी लाटेतही हा गड राखण्यात यशस्वी ठरले. आता लोकसभा निवडणूक 2019 मध्ये विद्यमान खासदार राजीव सातव निवडणुकीच्या रिंगणात नाहीत. त्याऐवजी काँग्रेस उमेदवार सुभाष बापूराव वानखेडे (Subhash Wankhede) हे रिंगणात आहेत. शिवसेनेकडून विद्यमान आमदार हेमंत पाटील (Hemant Patil) हे रिंगणात आहेत. तर वंचित बहुजन आघाडी कडून मोहन राठोड उमेदवार आहेत. धक्कादायक असे की, हिंगोलीमधून एकाच नावाचे सहा उमेदवार रिंगणात आहेत. त्यामुळे मतदारांमध्ये संभ्रम निर्माण होण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत कसे आहे हिंगोली लोकसभा मतदार संघातील राजकीय चित्र?

काँग्रेसची खेळी शिवसेनेची रणनिती

उर्वरित महाराष्ट्राप्रमाणे हिंगोली लोकसभा मतदारसंघात उन्हामुळे काहीली होत आहे. असल्या रणरणत्या उन्हातही उमेदवारांनी एकेका मतासाठी वनवन भटकत प्रचाराला जुंपून घेतले आहे. या मतदारसंघात एक, दोन, तीन नव्हे तर तब्बल 28 उमेदवार लोकसभेसाठी निवडणुकीच्या रिंगणात आहेत. विशेष म्हणजे एकाच नावाचे तब्बल सहा उमेदवार रिंगणात आहेत. काँग्रेसकडून सुभाष वानखेडे हे उमेदवार आहेत. मात्र, सुभाष वानखेडे याच नावाचे इतर पाच उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत वानखेडे हे शिवसेनेचे उमेदवार होते. त्या वेळी नामसाधर्म्य असणारे उमेदवार उभे करुन काँग्रेसने शिवसेनेविरोधात खेळी खेळल्याची चर्चा होती. त्या निवडणुकीत काँग्रेसच्या राजीव सातव यांनी त्यावेळी त्यांचा पराभव केला. आता राजीव सातव रिंगणात नाहीत. त्यामुळे काँग्रेसने या शिवसैनिकाला (सुभाष वानखेडे) काँग्रेसमध्ये प्रवेश देऊन उमेदवारी दिली. आता शिवसेनेने पाच सुभाष वाखेडे रिंगणात उतरवून तिच खेळी केल्याची चर्चा आहे. दरम्यान, वंचित बहुजन आघाडीने इथे उमेदवार उभा केला असला तरी प्रमुख लढत ही काँग्रेस विरुद्ध शिवसेना अशीच होणार असल्याची चर्चा आहे. शिवसेनेचे हेमंत पाटील विरुद्ध सुभाष वानखेडे असा समाना येथे रंगणार आहे. हेमंत पाटील हे विद्यमान आमदार आहेत.  (हेही वाचा, महाराष्ट्राचे राजकारण ढवळून टाकणारे बहुचर्चीत लोकसभा मतदारसंघ आणि लक्ष्यवेधी लढती)

हिंगोली लोकसभा मतदारसंघात येणारे विधानसभा मतदारसंघ

Vidhan Sabha constituency In Hingoli Lok Sabha Constituency | (Photo credit: archived, edited and representative images only)

एकाच नावाचे सहा उमेदवार

हिंगोली लोकसभा मतदारसंघात 28 उमेदवार लोकसभेसाठी नशीब आजमावत असले तरी, एकाच नावाचे सहा उमेदवार रिंगणात उतरल्याने मतदारांमध्ये कुतुहल आणि चर्चा आहे. शिवसेना उमेदवार सुभाष बापूराव वानखेडे यांच्यासह सुभाष काशिबा वानखेडे (अपक्ष), सुभाष मारोती वानखेडे (अपक्ष), सुभाष विठ्ठल वानखेडे (अपक्ष) तर, सुभाष परशराम वानखेडे( बहुजन महापार्ट), सुभाष नागोराव वानखेडे (हम भारतीय पार्टी) अशी या सहा उमेदवारांची नावे आहेत. (हेही वाचा, Lok Sabha Elections 2019: महाराष्ट्र लोकसभा मतदारसंघ आणि काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप उमेदवार संपूर्ण यादी)

हिंगोली लोकसभा मतदारसंघातून झालेले खासदार

Hingoli Lok Sabha Constituency mp | (Photo credit: archived, edited and representative images only)

अपक्ष उमेदवारांचाही मतदारांवर प्रभाव

दरम्यान, हिंगोलीमध्ये 28 उमेदवारांपैकी 11 उमेदवार हे पक्ष, संघटना आणि स्थानिक आघाड्यांच्या छत्राखाली निवडणूक लढवत आहेत. तर, उर्वरीत 17 उमेदवार अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत. एकूण उमेदवरांपैकी बसपचे दत्ता मारोती धनवे, काँग्रेसचे सुभाषराव बापूराव वानखेडे, शिवसेनेचे हेमंत पाटील, वंचित बहुजन आघाडीचे मोहन फत्तुसिंग राठोड आदी उमेदवार हे चर्चित आणि मतांच्या राजकारणात प्रभाव टाकरणारे म्हणून ओळकले जात आहेत.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now