Lok Sabha Elections 2019: प्रिया दत्त करणार कमबॅक, निवडणूक लढण्याचे दिले संकेत; खा. पूनम महाजन यांच्यासमोर तगडे आव्हान
दरम्यान, थेट पक्षनेतृत्वानेच विचारणा केल्यामुळे आपण निवडणूक लढविण्याचा विचार करीत आहोत. लवकरच याबाबत निर्णय जाहीर केला जाईल, असे प्रिया दत्त यांनी म्हटले आहे. प्रिया दत्त यांच्या निर्णयामुळे भाजप (BJP) खासदार पूनम महाजन (Poonam Mahajan) यांच्यासमोरील आव्हान अधिक मोठे झाले आहे.
Lok Sabha Elections 2019: उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून (Mumbai North Central Lok Sabha constituency) काँग्रेसच्या माजी खासदार प्रिया दत्त (Priya Dutt) पुन्हा एकदा पुनरागमन करण्याच्या तयारीत आहेत. काँग्रेस (Congress) अध्यक्ष राहुल गांधी ( Rahul Gandhi) यांच्याकडूनच थेट विचारणा झाल्यामुळे निर्णय बदलल्याचे प्रिया दत्त यांनी म्हटले आहे. प्रिया दत्त यांनी यापुढे आपण निवडणूक लढवणार नसल्याचे जाहीर केले होते. त्यामुळे या जागेवरुन निवडणूक लढविण्यासाठी काँग्रेसमधील अनेक इच्छूकांनी गुडघ्याला बाशींग बांधले होते. दरम्यान, थेट पक्षनेतृत्वानेच विचारणा केल्यामुळे आपण निवडणूक लढविण्याचा विचार करीत आहोत. लवकरच याबाबत निर्णय जाहीर केला जाईल, असे प्रिया दत्त यांनी म्हटले आहे. प्रिया दत्त यांच्या निर्णयामुळे भाजप (BJP) खासदार पूनम महाजन (Poonam Mahajan) यांच्यासमोरील आव्हान अधिक मोठे झाले आहे.
दरम्यान, 2014मध्ये आलेल्या काँग्रेस विरोधी लाटेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींची छाप जनमानसात अधिक गडद झाली. त्याचा परिणाम भाजला मोठ्या प्रमाणावर यश मिळण्यात झाला. काँग्रेस विरोधी लाटेचे पडसाद प्रिया दत्त यांचा बालेकिल्ला असलेल्या उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातही उमटले. भाजपच्या पूनम महाजन यांनी प्रिया दत्त यांचा एक लाख ८६ हजाराहून अधिक मतांनी पराभव केला. दरम्यानच्या काळात काही अडचणींमुळे आपण यापूढे लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचे प्रिया दत्त यांनी जाहीर केले. त्यामुळे या मतदारसंघातून कांग्रेसमध्ये इच्छूकांची स्पर्धा तर, भाजपच्या गोटात आनंदाचे वातावरण निर्माण झाले. (हेही वाचा, लोकसभा निवडणूक 2019: अभिनेता कृष्णा अभिषेक देणार काँग्रेसला हात? उत्तर मुंबई मतदारसंघातून राजकारणाच्या मैदानात?)
उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघ | ||
लोकसभा | खासदार | पक्ष |
सहावी लोकसभा १९७७-८० | अहिल्या रांगणेकर | मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष |
सातवी लोकसभा १९८०-८४ | प्रमिला दंडवते | जनता पार्टी |
आठवी लोकसभा १९८४-८९ | शरद दिघे | भारतीय राष्ट्रीय काँग्रेस |
नववी लोकसभा १९८९-९१ | विद्याधर गोखले | शिवसेना |
दहावी लोकसभा १९९१-९६ | शरद दिघे | भारतीय राष्ट्रीय काँग्रेस |
अकरावी लोकसभा १९९६-९८ | १९९६-९८ | शिवसेना |
बारावी लोकसभा १९९८-९९ | रामदास आठवले | भारतीय रिपब्लिकन पक्ष |
तेरावी लोकसभा १९९९-२००४ | मनोहर जोशी | शिवसेना |
चौदावी लोकसभा २००४-२००९ | एकनाथ गायकवाड | भारतीय राष्ट्रीय काँग्रेस |
पंधरावी लोकसभा २००९-२०१४ | प्रिया दत्त | भारतीय राष्ट्रीय काँग्रेस |
सोळावी लोकसभा २०१४- | पूनम महाजन | भारतीय जनता पक्ष |
2014च्या निवडणूकीत या मतदारसंघात यश मिळाल्यानंतर भाजपने या मतदारसंघात बऱ्यापैकी बस्तान बसवले. त्यातच आता शिवसेनेसोबतही युती झाल्याने या मतदारसंघातून विजयाची पूर्ण खात्री भाजपला आहे. दुसऱ्या बाजूला प्रिया दत्त निवडणूक लडवणार नसल्याने काँग्रेसमधून इच्छूकांच्या आपेक्षा वाढल्या. कृपाशंकर सिंह, नसीम खान व अन्य नेत्यांची नावे या जागेवरुन लढण्यासाठी पुढे येत होती. मात्र, थेट राहुल गांधी यांनीच विचारणा केल्यामुळे आता प्रिया दत्त यांनी पुन्हा एकदा लढण्याचे ठरवले आहे. आपण आपला निर्णय लवकरच जाहीर करु. मात्र, मैदानात उतरल्यानंतर विजयासाठी प्रयत्नांची पराकष्टा करु असे प्रिया दत्त यांनी म्हटल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिले आहे.