Lok Sabha Elections 2019: अमेठी येथून राहुल गांधी यांचा उमेदवारी अर्ज दाखल, प्रियंका गांधी, रॉबर्ट वाड्रा यांच्यासोबत रोड शो
भाजप जिल्हाध्यक्ष दुर्गेश त्रिपाठी यांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, स्मृती इराणी या 17 एप्रिल रोजी आपला निवडणूक अर्ज दाखल करणार होत्या. मात्र, त्या दिवशी सुट्टी असल्यामुळे आता त्या 11 एप्रिल रोजी अर्ज दाखल करणार आहेत.
Lok Sabha Elections 2019: काँग्रेस (Congress) अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी आपल्या पारंपरीक अमेठी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज बुधवारी दाखल केला. या वेळी बहीण प्रियंका गांधी-वाड्रा (Priyanka Gandhi Vadra), मेव्हणे रॉबर्ट वाड्रा (Robert Vadra), सोनिया गांधी (Sonia Gandhi) हे देखील राहुल गांधी यांच्या सोबत उपस्थित होते.
उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी राहुल गांधी यांनी प्रियंका गांधी, रॉबर्ट वाड्रा यांच्यासोबत अमेठी येथे रोड शो केला. या वेळी अमेठीतील नागरिकांनी त्यांचे जोरदार स्वागत केले. राहुल यांच्या रोड शोमध्ये अनेक तरुण, तरुणी, ज्येष्ठ आणि लहान मुलांचाही समावेश पाहायला मिळाला. महिलांची संख्याही लक्षणीय होती. काँग्रेस कार्यकर्त्यांमध्येही जोश पाहायला मिळत होता. मुशीगंज येथून हा रोड शो सुरु झाला. या वेळी हातात काँग्रेस पक्षाचा झेंडा, गळ्यात पक्षचिन्ह पंजाचा दुपट्टा, डोक्यावर टोपी अशा पेहरावात काँग्रेस कार्यकर्ते दिसत होते. रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या घरांमधून राहुल यांच्यावर फुलांचा वर्षावही होत होता.
दरम्यान, राहुल गांधी यांच्यासमोर भाजपने केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांना रिंगणात उतरवले आहे. 2014 मध्ये झालेल्या निवडणूकीतही राहुल यांच्या विरोधात स्मृती इराणी याच भाजपच्या उमेदवार होत्या. 2014 च्या निवडणूकीत राहुल गांधी यांनी स्मृती इराणी यांचा पराभव केला होता. दरम्यान, राहुल गांधी या वेळी दोन मतदारसंघातून निवडणूक लढत आहेत. अमेठी सोबतच राहुल गांधी हे केरळमधील वायनाड या लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. वायनाड येथून राहुल यांनी निवडणूक अर्ज भरला आहे. आज त्यांनी अमेठी लोकसभा मतदारसंघ या पारंपरीक मतदारसंघातूनही आपला निवडणूक अर्ज दाखल केला. (हेही वाचा, Lok Sabha Elections 2019 First Phase Poll: लोकसभा निवडणुकीसाठी विदर्भात 7, देशातील 84 मतदारसंघात उद्या मतदान होणार)
दरम्यान, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी अद्याप अमेठी येथून निवडणूक अर्ज दाखल केला नाही. भाजप जिल्हाध्यक्ष दुर्गेश त्रिपाठी यांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, स्मृती इराणी या 17 एप्रिल रोजी आपला निवडणूक अर्ज दाखल करणार होत्या. मात्र, त्या दिवशी सुट्टी असल्यामुळे आता त्या 11 एप्रिल रोजी अर्ज दाखल करणार आहेत.