Lok Sabha Elections 2019: उद्या अमित शहा उमेदवारी अर्ज भरणार, उद्धव ठाकरे सुद्धा राहणार उपस्थित

भाजप (BJP) पक्षाचे अध्यक्ष अमित (Amit Shah) शहा उद्या (30 मार्च) आगामी लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरणार आहेत.

Amit Shah and Uddhav Thackeray (Photo Credits-Twitter)

Lok Sabha Elections 2019: भाजप (BJP) पक्षाचे अध्यक्ष अमित (Amit Shah) शहा उद्या (30 मार्च) आगामी लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरणार आहेत. तसेच अर्ज भरण्याच्या वेळी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) सुद्धा उपस्थिती लावणार आहेत. परंतु उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी अमित शहा यांच्याकडून गुजरात (Gujrat) मध्ये भव्यदिव्य रोड शोच्या माध्यमातून जनतेला संबोधित करणार आहेत.

राज्यसभेचे खासदार असलेले अमित शहा पहिल्यांदाच लोकसभा निवडणुक लढवणार आहेत. तर अमित शहा यांना गांधीनगर येथून उमेदवारी देण्यात आली असून उद्या ते उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज भरणार आहेत. भाजप आणि शिवसेना पक्षाचे संबंध गेल्या काही वर्षांपासून ठिक नव्हते. परंतु दोन्ही पक्षाने युती करण्याच्या निर्णय घेतला गेला.(हेही वाचा-Lok Sabha Elections 2019: घराणेशाहीत भाजप एक पाऊल पुढे, काँग्रेसला टाकले मागे; लोकसभा निवडणुकीत चित्र स्पष्ट, राष्ट्रवादी काँग्रेस तर अव्वल क्रमांकावर)

शिवसेनेने मोदी सरकारवर वारंवार टीका केल्या आहेत. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी स्वबळावर निवडणुक लढवणार असल्याचे म्हटले होते. मात्र फेब्रुवारी महिन्यात भाजप आणि शिवसेनेने युती करण्याचा निर्णय घेतला असून दोन्ही पक्षाकडून एकमेकांमध्ये चांगले संबंध असल्याचे दाखवले जात आहे.