Lok Sabha Election 2024 : उत्तर पश्चिम मुंबई मतदार संघातून काँग्रेसकडून 'बड्या' अभिनेत्याला संधी मिळण्याची शक्यता

लवकरच त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.

Photo Credit - File Photo

Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकांचं (Lok Sabha Election) बिगूल केव्हाही वाजू शकतं. राज्यात महायुती विरुद्ध महाआघाडी असा रंजक सामना पाहायला मिळत आहे. लोकसभेच्या पार्श्वभूमीवर राज्यात सर्व पक्षांत जागा वाटापावरुन खलबत सुरु आहेत. जागा वाटपात काही जागांवर अनेक घटक पक्ष आग्रही आहेत. त्यावर तोडगा काढण्यासाठी बैठकांचे सत्र सुरु आहे. पण अजून कुठेच तोडगा निघाला नाहीये. उत्तर पश्चिम मुंबईत पण काहीसा असाच प्रकार पाहायला मिळत आहे. अनेक जण त्या जागेसाठी आग्रही आहेत. काँग्रेसकडून संजय निरुपम (sanjay nirupam) या मतदार संघासाठी इच्छूक आहेत. पण, दिल्लीतून स्टार चेहऱ्याला पसंती मिळत आहे. काँग्रेसने (congress) या मतदार संघात आता नवीन चेहऱ्याला संधी देण्याचे ठरवल्याची चर्चा सुरु आहे. याआधीही बॉलिवूड अभिनेता गोविंदाने या मतदारसंघातून नशीब आजमावले होते. (हेही वाचा:Lok Sabha Elections 2024: काँग्रेसकडून लोकसभा निवडणूकीसाठी 3 जागांवर उमेदवारांची घोषणा, प्रियंका गांधी 'या' मतदारसंघातून लढणार )

आता काँग्रेस श्रेष्ठींनी राज बब्बर यांचे नाव पुढे केले आहे. आतापर्यंत या मतदार संघात शिवसेना विरुद्ध काँग्रेस अशी लढत झाली होती. मात्र, आता समीकरणं बदलली आहे. उद्धव ठाकरे गटाने या जागेवर दावा सांगितला आहे. पण काँग्रेसही या जागेसाठी प्रयत्न करत आहे. तर महायुतीत हा मतदार संघ भाजपच्या पारड्यात पडण्याची शक्यता आहे. शिवसेना-भाजप युतीत शिवसेनेचे उमेदवार गजानन कीर्तीकर हे निवडून आले होते. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर त्यांनी शिंदे गटाची वाट धरली. पण सध्याच्या घडीला हा मतदार संघ भाजपच्या वाट्याला जाण्याची शक्यता आहे. याआधीही काँग्रेसकडून गोविंदाने पण नशीब आजमावले होते. त्यावेळी तो विजय पण झाला होता. (हेही वाचा:Lok Sabha Elections 2024: भाजपला लोकसभेत किती जागा मिळतील? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून भविष्यवाणी )

काँग्रेसकडून उत्तर पश्चिम मुंबईतून राज बब्बर यांचे नाव चर्चेत असल्याची माहिती टिव्ही नाईनच्या सूत्रांनी दिली आहे. राज बब्बर हे वर्सोवा येथे राहतात आणि सेलिब्रिटी चेहरा असल्याने त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार असल्याची शक्यता आहे.



संबंधित बातम्या