पुरी मतदार संघातून नरेंद्र मोदी नाही तर 'या' नेत्याला भाजप रिंगणात उतरवणार

लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election) भाजप (BJP) पक्षाची रविवारी (17 मार्च) पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता आहे.

पंतप्रधान मोदी आणि अमित शहा (फोटो सौजन्य- PTI)

लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election) भाजप (BJP) पक्षाची रविवारी (17 मार्च) पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता आहे.तसेच शनिवारी रात्री भाजपच्या मुख्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या उपस्थित केंद्रीय निवडणुक समितीची बैठक पार पडली. यावेळी उमेदवारांच्या नावाबद्दल चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे.

तर आज अमित शहा (Amit Shah) यांच्या अध्यक्षतेखाली भाजप पक्षाची एक महत्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीला योगी आदित्यनाथ, उत्तर प्रदेश उप मुख्यमंत्री दिनेश शर्मा आणि केशव मौर्या, महेंद्रनाथ पांडे यांच्यासह महामंत्री सुनील बन्सल उपस्थिती लावणार आहेत. त्यामुळे आजची महत्वापूर्ण बैठकीत नेमका काय निर्णय घेतला जाणार या बद्दल प्रश्न उपस्थित राहू लागले आहेत.(हेही वाचा-पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा यांच्या समवेत अनेक भाजप नेत्यांनी नावापुढे Chowkidar जोडत ट्विटरवरील नावात केला बदल)

बिहार येथील पाटणा साहिब येथील जागेवर भाजप खासदार शत्रुघ्न सिन्हा बंडखोरी करण्याची शक्यता आहे. त्यामुळे या जागेवरुन त्यांच्या जागेवर केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद भाजप कडून रिंगणात उतरवले जातील अशी अपेक्षा आहे. तर नरेंद्र मोदी हे पुरी येथील मतदार संघातून निवडणुक लढवणार असल्याचे सांगितले जात होते. मात्र या मतदार संघामधून संबित पात्रा भाजपचे उमेदवार असणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात येत आहे.