लोकसभा निवडणूक भाजप उमेदवार यादीत गुन्हेगरांचा टक्का वाढला; हंसराज अहिर यांच्यावर सर्वाधिक गुन्हे
टक्केवारीतच बोलायचे तर गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले खासदार निवडणून येण्याचे प्रमाण 13 टक्के आहे. तर, त्याउलट स्वच्छ प्रतिमा असलेल्या उमेदवारांचे निवडणून येण्याचे प्रमाण हे केवळ 5 टक्के
Lok Sabha Elections 2019: चौकीदार असण्याचा दावा करणाऱ्या भारतीय जनता पक्षामध्ये गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या मंडळींचा टक्का बराच वाढला आहे. त्यामुळे 'पार्टी विथ डिफरन्स' केवळ आता नावालाच राहिले आहे की काय असा सवाल विचारला जात आहे. लोकसभा निवडणूक 2019 साठीच्या भजप (BJP) उमेदवार यादीवर नजर टाकता हे अधिक ठळकपणे अधोरेखीत होते. भाजपने लोकसभेसाठी गुरुवारी जाहीर केलेल्या पहिल्या उमेदवार यादीतील एकूण उमेदवारांपैकी 35 उमेदवारांवर गुन्हे विविध पोलिस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल आहेत. उमेदवारांच्या प्रतिज्ञापत्रांचा अभ्यास करणाऱ्या ‘मायनेता डॉट इन्फो’ने जारी केलेल्या एका अहवालात ही माहिती पुढे आली आहे.
गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांची संख्या वाढू शकते
उमेदवारांच्या गुन्हेगारीबाबत न्यूज 18 ने दिलेल्या वृत्तानुसार, लोकसभा निवडणूक 2019 साठी भाजपने पहिली उमेदवार यादी जाहीर केली. त्यापैकी सुमारे 78 जणांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे. हे 78 उमेदवार 2014 मध्येही निवडणुकीच्या रिंगणात विजयी झाले होते. या 78 जणांपैकी 35 जणांच्या प्रतिज्ञापत्रात त्यांच्यावरील गुन्ह्यांबाबत उल्लेख होता. मात्र, उर्वरीत मंडळींनी प्रतिज्ञापत्रच सादर केले नाही. त्यामुळे त्यांच्यावरील गुन्ह्याबाबत माहिती मिळू शकली नसल्याचे या वृत्तत म्हटले आहे. ही प्रतिज्ञापत्रं सादर झाल्यास गुन्हेगार उमेदवारांचा आकडा वाढू शकतो.
गुन्हेगारी पार्श्वभूमी असणारे व्हीआयपी उमेदवार | |||
उमेदवाराचे नाव | राजकीय पक्ष | मतदारसंघ | गुन्ह्यांची संख्या |
हंसराज गंगाराम अहिर | भाजप | चंद्रपूर | ११ |
प्रताप सारंगी | भाजप | बालेश्वर (उडीसा) | 10 |
नितीन गडकरी | भाजप | नागपूर | 5 |
साक्षी महाराज | भाजप | उन्नाव (यूपी) | 8 |
*(आकडेवारी संदर्भ - मायनेता डॉट इन्फो) |
भाजप खासदार हंसराज अहिर यांच्यावर सर्वाधिक गुन्हे
दरम्यान, ‘मायनेता डॉट इन्फो’ने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार, चंद्रपूर मतदारसंघातील भाजप उमेदवार आणि मंत्री हंसराज अहिर यांच्याविरोधात 11 गुन्ह्यांची नोंद आहे. 2014 मध्ये उमेदवारी अर्जासोबत दिलेल्या प्रतित्रापत्रात त्यांनी याबाब उल्लेख केला आहे. अहिर हे सर्वाधिक गुन्हे दाखल असलेले पहिल्या यादितील भाजपचे उमेदवार आहेत. अहिर यांच्यानंतर भाजपचे उडीसातील बालेश्वर मतदारसंघातील उमेदवार प्रताप सारंगी यांचा क्रमांक लागतो. त्यांच्यावर 10 गुन्ह्यांची नोंद आहे. तर, नागपूर या बहूचर्चीत लोकसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार नितीन गडकरी यांच्यावर पाच गुन्ह्यांची नोंद आहे. उन्नाव लोकसभा मतदारसंगातील उमेदवार साक्षी महाराज यांच्यावर 8 गुन्ह्यांची नोंद आहे. (हेही वाचा, Lok Sabha Election 2019: भाजप VVIP उमेदवार आणि त्यांचे मतदारसंघ; नरेंद्र मोदी, अमित शाह रिंगणात)
16 वी लोकसभा: प्रमुख राजकीय पक्षांचे गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या खासदारांची संख्या | ||
राजकीय पक्षाचे नाव | एकूण खासदार | गुन्हेरी पार्श्वभूमीचे खासदार |
भाजप | 282 | 98 |
काँगेस | 48 | 8 |
*(आकडेवारी संदर्भ - असोसिएशन ऑफ डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (ADR) |
16 व्या लोकसभेत गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या खासदारांमध्ये भाजप अव्वल, काँग्रेस दुसऱ्या स्थानावर
लोकसभा निवडणूक 2014 नंतर असोसिएशन ऑफ डेमोक्रॅटिक रिफॉर्म्सने (ADR) जिंकून आलेल्या 543 खासदारांपैकी 542 खासदारांच्या प्रतिज्ञापत्राचा अभ्यास केला. या अभ्यासानुसार गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले सर्वाधिक खासदार हे भारतीय जनात पक्षात असल्याचे पुढे आले. 16 व्या लोकसभेत भाजपचे 282 खासदार होते. त्यापैकी 98 खासदार हे गुन्हेगारी पार्श्वभूमिचे होते. या लोकसभेत काँग्रेसचे 48 खासदार होते. त्यापैकी 8 खासदारांवर गुन्हे दाखल होते, असेही एडीआरने म्हटले आहे.
गुन्हेगार निवडून घेण्याची शक्यता अधिक
दरम्यान, एडीआरने नोंदवलेले धक्कादायक निरिक्षण असे की, स्वच्छ प्रितमा असलेल्या उमेदवाराच्या तुलनेत गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांचे निवडणूकीत निवडून येण्याचे प्रमाण अधिक असते. टक्केवारीतच बोलायचे तर गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले खासदार निवडणून येण्याचे प्रमाण 13 टक्के आहे. तर, त्याउलट स्वच्छ प्रतिमा असलेल्या उमेदवारांचे निवडणून येण्याचे प्रमाण हे केवळ 5 टक्के.