Kishori Pednekar on Nitesh Rane: शिवसेना संपवण्यासाठी काही लोकांनी सुपारी घेतली, किशोरी पेडणेकरांचं नितेश राणेंना प्रत्युत्तर
भाजप आमदार यांनी शिवसेनाप्रमुख उध्दव ठाकरेंवर केलेले आरोप बिनबूडाचे आहेत असं म्हणत नितेश राणेंवर हल्लाबोल केला आहे.
भाजप आमदार नितेश राणे यांनी ट्विट करत उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. नारायण राणे (Narayan Rane) यांनी जेव्हा शिवसेना (Shiv Sena) सोडली तेव्हा त्यांना संपवण्यासाठी उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) सुपारी दिली होती, असा खळबळजनक आरोप नितेश राणे (Nitesh Rane) यांनी केला आहे. तसेच म्याव म्याव संपू द्या, त्यानंतर आम्ही व्याजासकट वस्त्रहरण सुरु करु असा टोला नितेश राणेंनी आदित्य ठाकरेंना (Aditya Thackeray) लगावला आहे. नितेश राणेंच्या या आरोपानंतर खळबळ उडाली आहे. राजकीय वर्तूळात यासंबंधी चर्चा सुरु असुन यावर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी प्रतिक्रिया देत नितेश राणेंवर निशाणा साधला आहे.
किशोरी पेडणेकर म्हणाल्या कुठल्याही पक्षात कुणालाही सुपाऱ्या देवून मारण्याची प्रथा परंपरा नाही. तसेच कुणाचाही उध्दव ठाकरेंवर म्हणजे एका व्यक्तीवर नाही तर संपूर्ण पक्षावर राग आहे. राष्ट्रीय पक्षांना प्रादेशिक पक्ष संपावयचे आहेत, शिवसेना संपवायची आहे त्यासाठी हा कट रचला जात आहे अशी अप्रत्यक्ष टीका किशोरी पेडणेकरांनी भाजपवर (BJP) केली आहे. तसेच भाजप आमदार यांनी शिवसेनाप्रमुख उध्दव ठाकरेंवर केलेले आरोप बिनबूडाचे आहेत असं म्हणत नितेश राणेंवर हल्लाबोल केला आहे. (हे ही वाचा:- Nitesh Rane On Uddhav Thackeray: नारायण राणेंना संपवण्यासाठी उद्धव ठाकरेंनी सुपारी दिली होती, लवकरच वस्त्रहरण करु'; नितेश राणेंचा आरोप)
तसेच नारायण राणेंना मारण्यासाठी असंख्यवेळा सुपारी देण्यात आली असल्याचा दावा नितेश राणे यांनी केला आहेत. त्यांच्याकडे त्यासंबंधीत पुरावे असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. तसेच सोजवळ आणि साधे दिसणारे शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे किती विकृत आणि कपटी आहेत यासंबंधीचे सगळे पुरावे लवकरच सगळ्या पुढे आणणार असल्याचं भाजप आमदार नितेश राणे यांनी सांगितलं आहे.