National Navy Day 2020: पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि केंद्रीय परिवहन मंत्री नितिन गडकरी यांनी भारतीय नौदल दिनाच्या दिल्या शुभेच्छा
नौदल दिवस दरवर्षी 4 डिसेंबरला साजरा केला जातो.1971 च्या भारत-पाकिस्तान युद्धामध्ये भारतीय नौदलाच्या विजयाचा उत्सव म्हणून हा दिवस साजरा केला जातो.नौदल दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि केंद्रीय परिवहन मंत्री नितिन गडकरी यांनी भारतीय नौदला दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
भारतीय नौदल दिवस (Indian navy Day ) दरवर्षी 4 डिसेंबरला साजरा केला जातो.1971 च्या भारत-पाकिस्तान युद्धामध्ये भारतीय नौदलाच्या विजयाचा उत्सव म्हणून हा दिवस साजरा केला जातो.3 डिसेंबर रोजी हवाई क्षेत्र आणि सीमा भागावर पाकिस्तानी सैन्याने हल्ला केला.या हल्ल्यामुळे 1971 च्या युद्धाला सुरुवात झाली.पाकिस्तानला उत्तर देण्यासाठी 'ऑपरेशन ट्रायडंट' सुरू करण्यात आले.पाकिस्तानी नौदलाच्या कराची मुख्यालयाचे लक्ष्य ठेवून ही कारवाई सुरू करण्यात आली होती.
4 डिसेंबर 1971 रोजी भारतीय नौदलाने 'ऑपरेशन ट्रायडंट' अंतर्गत पाकिस्तानच्या कराची नौदल तळावर हल्ला केला. या कारवाईचे यश लक्षात घेऊन दरवर्षी 4 डिसेंबर रोजी नौदल दिन साजरा केला जातो.
नौदल दिनाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि केंद्रीय परिवहन मंत्री नितिन गडकरी यांनी भारतीय नौदला दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ( TIME मॅगझिन ची पहिली Kid Of The Year ठरली भारतीय वंशाची Gitanjali Rao, वयाच्या 15 व्या वर्षात गाठली यशाची पायरी)
पंतप्रधान नरेंद्र मोदी
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह
केंद्रीय परिवहन मंत्री नितिन गडकरी
भारतीय नौदल हा भारतीय सैन्याचा एक सागरी भाग आहे, जो 1612 मध्ये स्थापन झाला होता.ईस्ट इंडिया कंपनीने आपल्या जहाजांचे संरक्षण करण्यासाठी ईस्ट इंडिया कंपनीचे मरीन म्हणून सैन्य स्थापन केले होते. ज्याला नंतर रॉयल इंडियन नेव्ही असे नाव देण्यात आले. भारताच्या स्वातंत्र्यानंतर, 1950 मध्ये नौदलाची पुन्हा स्थापना झाली आणि त्याचे नाव भारतीय नौदल ठेवले.