Independence Day 2019 Live Streaming: राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे 73 व्या स्वातंत्र्य दिनाचे भाषण पहा Doordarshan News वर Online
रामनाथ कोविंद यांचे भाषण ऑल इंडिया रेडिओ आणि दूरदर्शनवर हिंदी भाषेनंतर इंग्रजीमध्ये दाखवण्यात येणार आहे.
73 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त (Independence Day)आज (14 ऑगस्ट) संध्याकाळी 7 वाजता राष्ट्रपती रामनाथ कोविंद (Ram Nath Kovind) देशाला संबोधित करणार आहेत. रामनाथ कोविंद यांचे भाषण ऑल इंडिया रेडिओ आणि दूरदर्शनवर हिंदी भाषेनंतर इंग्रजीमध्ये दाखवण्यात येणार आहे. राजधानी दिल्लीमधील (Delhi) लाल किल्ल्यावर 73 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त जोरदार तयारी करण्यात आली आहे. तसेच सुरक्षतेत अधिक वाढ केली आहे. तर 15 ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला संबोधित करणार आहेत.
रामनाथ कोविंद यांचे लाइव्ह भाषण पाहण्यासाठी दूरदर्शन न्युजला (Doordarshan News) भेट द्या.तसेच रामनाथ कोविंद आजच्या भाषणात कलम 370 बद्दल बोलणार का याकडे आता देशाचे लक्ष लागून राहिले आहे. मात्र कलम 370 जम्मू-कश्मीर मधून हटवल्यानंतर संतापलेले दहशतवादी मोठा हल्ला करण्याच्या तयारीत आहेत. परंतु गुप्तचर यंत्रणेकडून याबद्दल पूर्वसुचना देण्यात आली आहे. तसेच दिल्ली येथेसुद्धा सुरक्षतेत वाढ करण्यात आली आहे. सर्व प्रमुख ठिकाणांवर जवानांची करडी नजर असणार आहे.
रामनाथ कोविंद यांचे लाइव्ह भाषण येथे पाहा:
तसेच जम्मू-कश्मीर मध्ये 15 ऑगस्ट दिनानिमित्त सुरक्षा अधिक कडक करण्यात आली आहे. मात्र उद्या नरेंद्र मोदी स्वातंत्र्य दिनानिमित्त कोणत्या मुद्द्यांवर बोलणार याची उत्सुकता सर्वांना लागून राहिली आहे. यंदाचे वर्ष राजकारणात तसेच भारतीय अर्थकारण बरेच घडामोडींचे वर्ष होते. त्यात सलग दुस-यांदा पंतप्रधानपदावर नाव कोरलेल्या मोदींसाठीही हे वर्षे खास होते. भारतातील या बदलांचा, घडामोडींचा आढावा उद्याच्या भाषणात घेतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे.