नवज्योत सिंग सिद्धू यांच्यावर चप्पल फेकून मारणाऱ्या महिलेला पोलिसांकडून अटक

तसेच एका महिलेने त्यांच्या दिशेने चप्पल सुद्धा फेकून मारल्याचा प्रकार घडला आहे.

महिलेला अटक (फोटो सौजन्य-ANI)

देशात सध्या लोकसभा निवडणूकीचे वारे वाहत आहेत. याच पार्श्वभुमीवर काँग्रेस (Congress) नेते नवज्योत सिंग सिद्धू (Navjot Singh Sidhu) प्रचारसभेत व्यस्त असलेले दिसून येत आहेत. तसेच प्रचारादरम्यान सिद्धू हे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यवर टीका करत आहेत.तर बुधवारी एका प्रचारसभेत नवज्योतसिंग सिद्धू यांच्या समोर मोदी समर्थकांनी त्यांच्या नावाच्या घोषणा करण्यास सुरुवात केली. तसेच एका महिलेने त्यांच्या दिशेने चप्पल सुद्धा फेकून मारल्याचा प्रकार घडला आहे.

हरियाणा मधील रोहतक येथील काँग्रेस पक्षाचे उमेदवार दिपेंद्र हुड्डा यांच्या प्रचारासाठी सभेचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी मोदी मोदी नावाच्या घोषणा करण्यात आल्या. तसेच एका महिलेने सिद्धू यांच्या दिशेने पायातली चप्पल भिरकावली मात्र ती स्टेजवरच पडली. या प्रकरणी पोलिसांनी महिलेला अटक केली असून तिची कसून चौकशी करण्यात येत आहे.(दिल्ली: अरविंद केजरीवाल यांना कानशिलात लगावणाऱ्या व्यक्तीला दोन दिवसांची न्यायालयीन कोठडी)

जितेंद्र कौर असे महिलेचे नाव असून आपला राग व्यक्त करत हे कृत केल्याचे सांगण्यात येत आहे. तर तपासणी दरम्यान कौर हिने असे सांगितले की, सिद्धू यांना भाजप पक्षात काही करता आले नसल्याने काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. यापूर्वी सोनिया गांधी आणि मनमोहन सिंग यांच्यावर टीका करत होते. तर आता मोदी यांच्यावर टीका करत असल्याचे कौर हिने स्पष्ट केले आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif