हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीत सत्तापरिवर्तनाची परंपरा कायम आहे. हिमाचलमधील सर्व 68 विधानसभा जागांचे निकाल जाहीर झाले आहेत. निकालात काँग्रेसने 40 तर भाजपने 25 जागा जिंकल्या आहेत. येथे तीन अपक्ष उमेदवार विजयी झाले आहेत. हिमाचलमध्ये 2017 च्या तुलनेत भाजपने 19 जागा गमावल्या आहेत. निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, हिमाचलमध्ये भाजपची मतांची टक्केवारी 43 टक्के होती, तर विजयी काँग्रेसला 43.91 टक्के मते मिळाली आहेत. हिमाचल प्रदेशचे मावळते मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी राज्यपाल आरव्ही आर्लेकर यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला आहे.
हिमाचल प्रदेश मध्ये कॉंग्रेस ने बहुमत जिंकले आहे. 35 जागा कॉंग्रेसने जिंकल्या असून 5 जागांवर आघाडीवर आहे तर भाजपाने 18 जागा जिंकल्या असून ते 7 जागांवर आघाडीवर आहे.
Himachal Pradesh CM Jairam Thakur राजीनामा सोपवण्यासाठी राजभवनावर दाखल झाले आहे. जयराम ठाकूर यांचा सलग सहाव्यांदा विधानसअभा निवडणूकीमध्ये विजय झाला आहे. पण सध्या कॉंग्रेस बहुमताकडे आगेकूच करत आहे.
Priyanka Gandhi यांचा 10 कलमी कार्यक्रम हिमाचल प्रदेशात काम करून गेला, पुढील मुख्यमंत्री हाय कमांड ठरवेल अशी प्रतिक्रिया Chhattisgarh CM Bhupesh Baghel यांनी दिली आहे. दरम्यान भाजपाचा गुजरात मधील निकाल देखील आश्चर्यकारक आहे असे ते म्हणाले आहेत.
हिमाचल प्रदेश मध्ये कॉंग्रेस ने 16 तर भाजपा ने 13 जागा जिंकल्या आहेत. अटीतटीच्या लढाईमुळे अंतिम निकालाची उत्सुकता आहे. सध्या कॉंग्रेसकडे 23 आणि भाजपाकडे 13 जागांची आघाडी आहे.
हिमाचल मध्ये कांटे की टक्कर सुरू आहे. कॉंग्रेसचा 1 उमेदवार विजयी, 39 आघाडीवर आहेत. तर भाजपाचे 4 विजयी 21 आघाडीवर आहेत. कॉंग्रेस कडून आघाड्यांमध्ये पक्ष बहुमताजवळ पोहचल्याचा आनंद देखील साजरा करण्यास सुरूवात केली आहे.
हिमाचल प्रदेशात कॉंग्रेस पक्ष बहुमताजवळ पोहचताच कार्यकर्त्यांचे फटाके वाजवून सेलिब्रेशनला सुरूवात झाली आहे. कॉंग्रेस,भाजपामध्ये कांटे की टक्कर सुरू आहे. अद्यापही मतमोजणी सुरू असून अंतिम निकाल काय येणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.
Jamnagar North Election Result: भाजपा उमेदवार Rivaba Jadeja 31,333 मतांनी आघाडीवर आहेत. कार्यकर्त्यांसोबत त्यांनी आपलं यश शेअर केले आहे. रिवाबा जडेजा या क्रिकेटर रविंद्र जडेजा यांच्या पत्नी आहेत.
गुजरात विधानसभेतील भाजपा च्या स्विपिंग विजयावर सुरत मध्ये कार्यकर्त्यांचं ताशा वाजवून सेलिब्रेशन करण्यात आलं आहे. भाजपाकडून 5 उमेदवार विजयी झाले आहेत. तर 150 जागांवर त्यांचे उमेदवार आघाडीवर आहेत.
Gujarat CM Bhupendra Patel आणि प्रदेशाध्यक्ष CR Paatil यांच्याकडून गुजरात मध्ये भाजपा पक्षाच्या दमदार यशावर सेलिब्रेशन सुरू करण्यात आलं आहे. त्यांच्याकडून मिठाईवाटप करण्यात आले आहे.
Gujarat CM Bhupendra Patel आणि प्रदेशाध्यक्ष CR Paatil यांच्याकडून गुजरात मध्ये भाजपा पक्षाच्या दमदार यशावर सेलिब्रेशन सुरू करण्यात आलं आहे. त्यांच्याकडून मिठाईवाटप करण्यात आले आहे.
Gujarat CM Bhupendra Patel आणि प्रदेशाध्यक्ष CR Paatil यांच्याकडून गुजरात मध्ये भाजपा पक्षाच्या दमदार यशावर सेलिब्रेशन सुरू करण्यात आलं आहे. त्यांच्याकडून मिठाईवाटप करण्यात आले आहे.
हिमाचल प्रदेशात Hamirpur मतदारसंघात अपक्ष Ashish Sharma आघाडीवर आहे. सध्या कॉंग्रेस, भाजपा मध्ये कांटे की टक्कर सुरू असल्याने त्यांचा पाठिंबा कुणाला जाणार याबाबत आपण अंतिम निकाल हाती आल्यानंतर निर्णय घेणार असल्याचं ते म्हणाले आहेत.
हिमाचल प्रदेश (Himachal Pradesh) आणि गुजरात विधानसभा निवडणूक (Gujarat Vidhan Sabha Election) मतदानामध्ये जनतेने दिलेला कौल आज जाहीर केला जाणार आहे. सकाळी 8 वाजल्यापासून या निवडणूक निकालाचे कौल हाती येण्यास सुरूवात होणार आहे. गुजरात मध्ये 182 आणि हिमाचल प्रदेशात 68 विधानसभा जागांसाठी मतदान पार पडले आहे. दरम्यान आतापर्यंत हिमाचल प्रदेशात सत्तांतराची रीत आहे तीच कायम राहणार की बदलणार याकडे सार्यांचे लक्ष लागले. गुजरात हा भाजपाचा बालेकिल्ला आहे. मागील 25 वर्ष सत्ता कायम राखणार्या गुजरात मध्ये भाजपा यंदा रेकॉर्डब्रेक कामगिरी करणार का? हे देखील पहावं लागणार आहे.