मनोहर पर्रिकर यांच्या निधनानंतर गोवा राज्याचे मुख्यमंत्री पद भाजप नेते प्रमोद सावंत यांच्याकडे; 10 मुद्दे
मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर प्रमोद सावंत म्हणाल की, पक्षाने जी जबाबदारी माझ्यावर सोपवली आहे ती मी पार पाडण्याचा यशस्वी प्रयत्न करेन. आज मी जो काही आहे तो पर्रिकर यांच्यामुळेच आहे. त्यांनीच मला राजकारणात आणले आणि गोवा विधानसभेचे अध्यक्षही बनवले.
मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या निधनानंतर गोवा राज्याचे मुख्यमंत्री कोण, याबाबत सुरु झालेल्या चर्चा, उत्सुकता आणि राजकीय हालचालींना अखेर पूर्णविराम मिळाला. भाजप नेते प्रमोद सावंत (Pramod Sawant) गोवा राज्याचे मुख्यमंत्री (Chief Minister of Goa) बनले आहेत. सावंत यांनी मध्यरात्री 1.45 मनिटांनी मुख्यमंत्री आणि गोपनीयतेची शपथ राजभवनात आयोजित कार्यक्रमात घेतली. राज्यपाल मृदुला सिन्हा (Mridula Sinha) यांनी त्यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. प्रमोद सावंत यांच्यासोबतच विजय सरदेसाई (Vijai Sardesai ) आणि सुदिन ढवळीकर (Sudin Dhavalikar) यांनीही उपमुख्यमंत्र्यांनीही पद आणि गोपनियतेची शपथ घेतली. सोमवारी रात्री उशीरा आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याशिवा इतर 9 मंत्र्यांनीही पद आणि गोपनियतेची शपथ घेतली.
मनोहर पर्रिकर यांचे निधन आणि गोवा राज्यातील राजकारणातील काही मुद्दे
- प्रमोद सावंत (Pramod Sawant)गोवा राज्याचे मुख्यमंत्री बनले. रात्री दोनच्या सुमारास त्यांनी पद गोपनियतेची शपथ घेतली.
- MGP चे सुदिन ढवळीकर आणि गोवा फॉरवर्ड पार्टी (GFP) चे विजय सरदेसाई यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यांच्यासोबत इतरही 9 मंत्र्यांनी पद आणि गोपनियतेची शपथ घेतली.
- गोवा राज्याचे नवनिर्वाचीत मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे गोवा विधानसभेचे अध्यक्ष होते. पर्रिकर यांचे निकटवर्तीय अशी त्यांची ओळख होती.
- गोवा राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे पेशाने शेतकरी आणि आयुर्वेदिक डॉक्टर आहेत. त्यांचा जन्म 24 एप्रिल 1973 मध्ये झाला. त्यांची पत्नी सुलक्षणा या भाजप नेता आणि शिक्षिका आहेत.
- गोव्याचे मुख्यमंत्री मुख्यमंत्री मनोरह पर्रिकर यांचे रविवारी निधन झाले. ते 63 वर्षांचे होते. गेले वर्षभर त्यांना कर्करोगाच्या आजाराने ग्रासले होते.
- मनोहर पर्रिकर हे केंद्रात संरक्षण मंत्री होते. मात्र, गोवा विधानसभा निवडणूक निकालानंतर निर्माण झालेली त्रिशंकू स्थिती पाहून पक्षनेतृत्वाने त्यांच्यावर मुख्यमंत्री पदाची जबाबदारी सोपवली. पर्रिकर
- पुन्हा एकदा दिल्लीहून गोव्यात आले. ते आघाडीचे सरकार चालवत होते. त्यांच्या सरकारमध्ये गोवा फॉरवर्ड पार्टी, एमजीपी आणि अपक्षांचा समावेश होता.
- पर्रिकर यांच्या निधनाची बातमी येताच काँग्रेसने मुख्यमंत्री पदावर दावा सांगत सरकार बनविण्यासाठी अपेक्षीत संख्याबळ आपल्याकडे असल्याचे म्हटले होते. त्यासाठी राज्यपालांनी सत्तास्थापनेसाठी काँग्रेसला निमंत्रण द्यावे अशीही काँग्रेसची मागणी होती.
- पर्रिकर यांच्या निधनानंतर मुख्यमंत्री पदासाठी प्रमोद सावंत यांच्या नावाला भाजपेत्तर सहकारी पक्षांची सहमती नव्हती. परंतू, राजकीय वाटाघाटी करण्यात सावंत यशस्वी ठरले. त्यांनी मित्रपक्षांचे मन वळवले.
- गोवा विधानसभेत सर्वाधिक जागा मिळवलेला पक्ष काँग्रेस आहे. तरीही भाजने इतर पक्षांची आघाडी करत बहुमतासाठी आवश्यक आकडा गाठून सत्ता स्थापन केली आहे. (हेही वाचा, मनोहर पर्रिकर: सर्वासामान्य माणूस ते राजकीय नेता आणि व्यक्तिमत्व वैशिष्ट्ये)
दरम्यान, मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर प्रमोद सावंत म्हणाले की, पक्षाने जी जबाबदारी माझ्यावर सोपवली आहे ती मी पार पाडण्याचा यशस्वी प्रयत्न करेन. आज मी जो काही आहे तो पर्रिकर यांच्यामुळेच आहे. त्यांनीच मला राजकारणात आणले आणि गोवा विधानसभेचे अध्यक्षही बनवले. प्रमोद सावंत यांच्याकडे मुख्यमंत्री पद असले तरी, महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे (MGP) सुदिन ढवळिकर आणि गोवा फॉर्वर्ड पार्टीचे (GFP) विजय सरदेसाई हे उपमुख्यमंत्री असणार आहेत. त्यामुळे त्यांचे सहकार्य सावंत यांना कारभार करताना कसे मिळते हे पाहावे लागणार आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)