Sheila Dikshit Passes Away: दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री, काँग्रेस पक्षाच्या जेष्ठ नेत्या शीला दीक्षित यांचे निधन
त्या 81 वर्षांच्या होत्या. काँग्रेस पक्षाच्या त्या अत्यंत जुन्या आणि जाणकार नेत्या होत्या. 1998 ते 2013 इतका प्रदीर्घ काळ त्या दिल्लीच्या मुख्यमंत्री होत्या.
Former Delhi Chief Minister Sheila Dikshit Passes Away: दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री (Former Delhi Chief Minister), काँग्रेस पक्षाच्या जेष्ठ नेत्या शीला दीक्षित (Sheila Dikshit) यांचे निधन निधन झाल आहे. त्या 81 वर्षांच्या होत्या. राजधानी दिल्ली (Delhi ) येथे शनिवारी (20 जुलै 2019) त्यांनी अखेरचा श्वास घेतला. शीला दीक्षित यांच्यावर उपचार करणारे फोर्टीस रुग्णालयाचे डॉ. अशोक सेट यांच्या अधिकृत हवाल्याने एएनआय वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, शीला दीक्षित यांना शनिवारी दुपारी 3.15 च्या सुमारास कार्डिएक अरेस्ट आला. त्यानंत त्यांना कृत्रिम श्वसन यंत्रणेव (Ventilator) ठेवण्यात आले. मात्र, शनिवारी दुपारी 3.55 वाजता त्यांचे निधन झाले.
शीला दीक्षित या प्रदीर्घ काळापासून आजारी होत्या. काँग्रेस पक्षाने नुकतीच त्यांच्यावर दिल्ली काँग्रेसच्या अध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवली होती. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी उत्तर पूर्व दिल्ली लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. मात्र, त्यात त्यांचा पराभव झाला. काँग्रेस पक्षाच्या त्या अत्यंत जुन्या आणि जाणकार नेत्या होत्या. 1998 ते 2013 इतका प्रदीर्घ काळ त्या दिल्लीच्या मुख्यमंत्री होत्या. एएनआय या वृत्तसंस्थेने दीक्षित यांच्या निधनाबाबत वृत्त दिले आहे.
एएनआय ट्विट
मृदू स्वभाव आणि लाघवी हास्य
मृदू स्वभाव आणि लाघवी हास्य हे शीला दीक्षित यांच्या स्वभावाचे वैशिष्ट्य होते. दिल्ली हा केंद्र शासित प्रदेश असतानाही त्यांनी दिल्लीचा कारभार मुख्यमंत्री म्हणून कुशलतेने चालवला. त्या दिल्लीच्या मुख्यमंत्री असताना केंद्रात काँग्रेसचेच सरकार दीर्घ काळ होते. परंतू, विरोधी पक्षाचे सरकार केंद्रात असतानाही त्यांनी केंद्र सरकार सोबत अत्यंत सौहार्दाचे संबध ठेवले. खास करुन दिल्लीच्या राज्यपालांसोबतही त्याचे फारसे मतभेद झाले नाहीत. (हेही वाचा, केंद्रीय मंत्री अनंत कुमार यांचे निधन; पंतप्रधानांसह अनेक मान्यवरांकडून शोक व्यक्त)
इंदिरा गांधी, राजीव गांधी पंतप्रधान असतानाच्या काळापासून त्या काँग्रेस पक्षात सक्रीय होत्या. काँग्रेस पक्षावर त्यांची नितांत निष्ठा होती. या निष्ठेमुळेच त्यांना दिल्लीचे मुख्यमंत्री पद प्रदीर्घ काळ मिळाले असा त्यांच्यावर आरोपही होतो आणि याच वाक्यात त्यांचे कौतुकही केले जाते. काही राज्यांच्या त्या राज्यपालही होत्या.