राष्ट्रध्वजाचा अपमान केल्याप्रकरणी अरविंद केजरीवाल यांच्यावर FIR दाखल होणार

मध्य प्रदेश (Madya Pradesh) मधील सागर येथील एका न्यायालयाने नवी दिल्ली मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arwind Kejriwal) आणि आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांविरोधात राष्ट्रध्वजाचा अपमान केल्याने एफआयआर (FIR) दाखल केला जाणार आहे.

अरविंद केजरीवाल (Photo Credits: PTI)

मध्य प्रदेश (Madya Pradesh) मधील सागर येथील एका न्यायालयाने नवी दिल्ली मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arwind Kejriwal) आणि आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांविरोधात राष्ट्रध्वजाचा अपमान केल्याने एफआयआर (FIR) दाखल केला जाणार आहे.

राजेंद्र मिश्रा या व्यक्तीने राष्ट्रध्वजाचा अपमान केल्याप्रकरणी याचिका दाखल केली आहे. तर 2014 रोजी निवडणुकीच्या वेळी केजरीवाल आणि कार्यकर्त्यांनी त्यांचे झाडू हे चिन्ह आपल्या तिरंग्यास फडकवल्याचा आरोप करण्यात आला आहे.

यामुळे तिरंगा हा झाडूच्या चिन्हाचासह असलेल्या झेंड्यासह फडकवणे हा राष्ट्रध्वजाचा अपमान असल्याचे याचिकार्त्याने म्हटले आहे.या प्रकरणी न्यायालयाने एफआयआर दाखल करण्यस परवानगी देऊ केली आहे.