Lok Sabha Election 2019: संध्याकाळी 6.30 च्या नंतर एक्झिट पोल दाखवण्याचे निवडणूक आयोगाचे निर्देश
एग्झिट पोल 6.30 च्या नंतर प्रसारित करावे असे निर्देश निवडणूक आयोगाने दिले आहेत.
Lok Sabha Election 2019: लोकसभा निवडणूक 2019 आता अंतिम टप्प्यात आली असून, आज शेवटच्या म्हणजेच सातव्या टप्प्यातील मतदान होत आहे. हे मतदान संध्याकाळ 6 वाजता संपताच सर्व प्रसारमाध्यमांचे एक्झिट पोल सुरु होईल. मात्र हे एक्झिट पोल 6.30 च्या नंतर प्रसारित करावे असे निर्देश निवडणूक आयोगाने दिले आहेत. अंतिम टप्प्यातील मतदान संपताच एक्झिट पोलसाठी निवडणूक आयोगाची मंजूरी मिळणे आवश्यक असते. त्यामुळे जेव्हा निवडणूक आयोगाची मंजूरी मिळेल, तेव्हाच एक्झिट पोल सुरु करावे असे आयोगाने सांगितले आहे.
निवडणूक आयोगाने ह्यासंबंधी काही नियमावाली आखली आहे. त्यानुसार, इलेक्ट्रॉनिक मीडिया, वेबसाइट आणि सोशल मीडिया प्लेटफॉर्म्सने ह्या नियमांचे पालन करणे बंधनकारक राहणार आहे. त्या निर्देशानुसार, संध्याकाळी 6.30 नंतर एक्झिट पोल सुरु केले जावे, असे नमूद करण्यात आले आहे. लोकप्रतिनिधित्व अधिनियम, 1951, कलम 126A चे उपकलम (1) च्या अंतर्गत 11 एप्रिलला सकाळी 7.00 वाजता आणि 19 मे ला संध्याकाळी 6.30 च्या आधी एक्झिट पोल चे प्रसारण न करण्याचे निर्देश दिले आहेत.
जोपर्यंत निवडणुकांचे निकाल येत नाही, तोपर्यंत जनता एक्झिट पोल आणि ओपिनियन पोल च्या आधारावर निकालांचे संकेत समजतात. मात्र वेगवेगळ्या स्तरांवर केले गेलेले हे एक्झिट पोल आणि त्यांचा अंदाजही वेगवेगळा असतो. मात्र साधारण निवडणुकींच्या निकालाचा अंदाज बांधण्यासाठी आणि लोकांमधील उत्सुकता ताणून धरण्यासाठी हे एक्झिट पोल असतात.