दिल्ली: संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये सुरु असलेल्या बैठकीत नरेंद्र मोदी यांची NDA च्या नेतेपदी निवड

नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची एनडीएच्या (NDA) नेतेपदी निवडण करण्यात आली आहे.

PM Narendra Modi (Photo Credits-ANI)

दिल्ली (Delhi) मधील सेंट्रल हॉलमध्ये एनडीएच्या सरकारची बैठक सुरु आहे. या बैठकीला एनडीएचे नवनियुक्त खासदार आणि अन्य पक्षांच्या नेत्यांनी उपस्थिती लावली आहे. तर यावेळी नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची एनडीएच्या (NDA) नेतेपदी निवडण करण्यात आली आहे.

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजप पक्षाला स्पष्टपणे 303 जागा मिळाल्या असून एनडीए सरकारला 350 पेक्षा अधिक जागांवर विजय मिळवता आला आहे. येत्या 30 मे रोजी पंतप्रधान पदासाठी नरेंद्र मोदी दुसऱ्यांदा शपथ घेणार असल्याचे सांगितले जात आहे. तर मथुरा येथून विजयी झालेल्या हेमा मालिनी यांनी मोदी यांचे कौतुक केले असून त्यांच्या मेहनतीमुळे हे सर्व यश प्राप्त झाले असल्याचे म्हटले आहे.(राज्यसभा: भाजप प्रणीत NDA देशाच्या इतिहासात प्रथमच मिळवणार बहुमत, काँग्रेस, UPA अल्पमतात)

तर आता नरेंद्र मोदी यांच्या भाषणाला सुरुवात झाली असून देशात मोठ्या पातळीवर राजकीय बदल होत आहेत. तसेच दिवसेंदिवस भारत देशाची लोकशाही ही अधिक दृढ होत चालली असून नव्या उर्जेने कामाला लागणार असल्याचे मोदी यांनी म्हटले आहे. त्याचसोबत या निवडणुकीतील भारत भ्रमण ही माझ्यासाठी एक पवित्र यात्रा होती असे मोदींने म्हटले आहे. परंतु देशात आम्ही नाही तर जनतेने सरकार चालवले आहे. यंदाची निवडणूक ही समतेचे प्रतिक असल्याचे मोदी यांनी म्हटले आहे.

दरम्यान मोदी हे सोमवारी वाराणसी येथे जाणार आहे. तसेच उद्या आईचा आशीर्वाद घेण्यासाठी गुजरातला जाणार असल्याचे मोदी म्हटले आहे. त्याचसोबत देशातील सर्व जनतेचे उद्या आभार मानणार असल्याचे मोदी यांनी सांगितले आहे.