Delhi Election Results 2020: नवी दिल्लीमध्ये अरविंद केजरीवाल यांचं डबल सेलिब्रेशन; विजयाच्या हॅट्रिक सोबत साजरा केला पत्नीचा वाढदिवस

एकीकडे सलग तिसर्‍यांदा दिल्ली विधानसभेमध्ये आम आदमी पार्टीचा दणदणीत विजय झाला आहे. तर आजच अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांची पत्नी सुनिता यांचा वाढदिवस असल्याने त्यांचा आनंद द्विगुणित झाला आहे

अ‍रविंद केजरीवाल । Photo Credits: Twitter/ ANI

अरविंद केजरीवाल यांच्यासाठी आज दिल्लीमध्ये डबल सेलिब्रेशनचा दिवस आहे. एकीकडे सलग तिसर्‍यांदा दिल्ली विधानसभेमध्ये आम आदमी पार्टीचा दणदणीत विजय झाला आहे. तर आजच अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांची पत्नी सुनिता यांचा वाढदिवस असल्याने त्यांचा आनंद द्विगुणित झाला आहे. दिल्लीमधील आपच्या कार्यालयामध्ये केक कापून केजरीवाल यांनी हे डबल सेलिब्रेशन साजरं केलं आहे. दरम्यान नवी दिल्ली विधानसभा मतदार संघातून अरविंद केजरीवाल आघाडीवर आहेत. तर दिल्लीमध्ये केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीला 61 जागांवर आघाडी असल्याचं चित्र समोर आहे. त्यामुळे 2013,2015 नंतर 2020 असा सलग तिसर्‍यांदा आपला दिल्लीमध्ये दणदणीत विजय मिळाला आहे त्यामुळे अरविंद केजरीवाल तिसर्‍यांदा मुख्यमंत्रीपदावर विराजमान होणार आहेत. Delhi Assembly Election Results 2020 Live Updates: दिल्ली निकाल 'आप'च्या बाजूने लागल्याचं आश्चर्य नाही - शरद पवार.  

दिल्लीमध्ये 70 जागांसाठी 8 फेब्रुवारीला मतदान पार पडले. त्यानंतर एक्झिट पोलने देखील आपच्या बाजूने कौल दिला होता. त्यानुसार आज सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरूवात झाली आहे. निकालामध्येही 'आप' ला स्पष्ट बहुमत मिळत असल्याचं चित्र आहे.

अरविंद केजरीवाल यांचं सेलिब्रेशन

अरविंद केजरीवाल यांच्या विजयावर देशभरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. दरम्यान शरद पवार, रोहित पवार, ममता बॅनर्जी यांच्यासह कॉंग्रेस पक्षाने देखील दिल्ली विधानसभेतील निकालचं कौतुक करत अभिनंदन केलं आहे.