CWC Updates: राहुल गांधी हेच अध्यक्ष पदावर राहतील, कार्यकारिणीने राजीनामा फेटाळला: काँग्रेस

दरम्यान, काँग्रेस समितीची बैठक पूर्ण झाल्यानंतर राहुल गांधी किंवा पक्षाच्या इतर कोणत्याच नेत्याने प्रसारमाध्यमांशी संवाद साधला नाही. काँग्रेस प्रवक्ता सुरजेवाला यांनी पत्रकार परिषद घेत बैठकीतील एकूण वृत्तांत थोडक्यात सांगितला.

Randeep Surjewala | (Photo Credits: ANI / Twitter)

Congress Working Committee (CWC) Meeting: लोकसभा निवडणूक 2019 (Lok Sabha Election)मध्ये झालेल्या पराभवावर चिंतन करण्यासाठी आयोजित करण्यात आलेली काँग्रेस कार्यकारिणी समितीची बैठक अखेर संपली आहे. या बैठकीत राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी काँग्रेस अध्यक्ष पदाचा राजीनामा देऊ केला. मात्र, काँग्रेस कार्यकारिणीने हा राजीनामा (Rahul Gandhi Resignation) स्वीकारला नाही, अशी माहिती काँग्रेस प्रवक्ते रणदीप सिंह सुरजेवाला यांनी दिली. काँग्रेस कार्यकारिणीची बैठक संपल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत सुरजेवाला यांनी ही माहिती दिली. दरम्यान, पुढील अध्यक्ष गांधी कुटुंबातील नसावा असेही राहुल गांधी यांनी म्हटल्याचे सुरजेवाला यांनी यावेळी सांगितले.

काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीस प्रियंका गांधी वाड्रा, सोनिया गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्यासह काँग्रेसचे अनेक मान्यवर उपस्थित होते. दरम्यान, काँग्रेस समितीची बैठक पूर्ण झाल्यानंतर राहुल गांधी किंवा पक्षाच्या इतर कोणत्याच नेत्याने प्रसारमाध्यमांशी संवाद साधला नाही. काँग्रेस प्रवक्ता सुरजेवाला यांनी पत्रकार परिषद घेत बैठकीतील एकूण वृत्तांत थोडक्यात सांगितला. (हेही वाचा, राहुल गांधी काँग्रेस अध्यक्ष पदावर कायम; पक्षाच्या कार्यकारिणी समितीने फेटाळला राजीनामा; देशभरात प्रादेशिक नेतृत्व बदलाचे संकेत)

एएनआय ट्विट

लोकसभा निवडणुकीत देशभरात झालेल्या सर्वाव्यापी पराभव पाहून काँग्रेस पक्ष (Congress Party) हादरुन गेला आहे. काँग्रेसने ही निवडणूक पक्षाध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या नेतृत्वाखाली लढली होती. या निवडणुकीत काँग्रेसने प्रियंका गांधी यांनाही मर्यादीत स्वरुपात मैदानात उतरवले होते. अनेक प्रयत्न करुनही काँग्रेस ही निवडणूक हारली. भाजपचा देशभरात प्रचंड मोठा विजय झाला. या पार्श्वभूमिवर काँग्रेस पक्षाच्या कार्यकारी समिती (Congress Working Committee) आज (25 मे 2019) नवी दिल्ली येथे बैठक पार पडली. दरम्यान, या बैठकीत राहुल गांधी आपल्या अध्यक्ष पदाचा राजीनामा देण्याचीही शक्यता वर्तविण्यात येत होती. मात्र, काँग्रेसने बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही शक्यता फेटाळून लावली.