विजय होणार म्हणून 'या' भाजप उमेदवाराने वाटले लाडू, निकालअंती झाला पराभव
तर काँग्रेस (Congress) पक्षाला महज बस्तर आणि कोरबा लोकसभेच्या जागेवर विजय मिळवता आला आहे.
छत्तीसगड (Chhattisgarh) येथे भाजप (BJP) पक्षाने जबदरस्त विजय मिळवला असून 11 पैकी 9 लोकसभेच्या जागांवर विजय मिळवला आहे. तर काँग्रेस (Congress) पक्षाला महज बस्तर आणि कोरबा लोकसभेच्या जागेवर विजय मिळवता आला आहे. परंतु निवडणुकीच्या निकालावेळी एक जबरदस्त किस्सा घडला आहे. त्यावेळी भाजप पक्षाचे उमेदवार ज्योतिनंद दुबे (Jyoti Nand Dubey) हे सकाळपासून आघाडीवर होते. मात्र संध्याकाळी हे चित्र काहीसे वेगळे दिसून आले.
त्यावेळी कार्यकर्त्यांना असे वाटले की, ज्योतिनंद यांचा विजय होईल. त्यासाठी त्यांनी कार्यकर्त्यांमध्ये निकालापूर्वीच विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी सर्वांना लाडू वाटप केले. तसेच ढोल-ताशे वाजवण्यात आले. परंतु दुपार नंतर ज्योतिनंद हे सातत्याने पिछाडीवर होते. त्यानंतर संध्याकाळ पर्यंत आलेल्या निकालात त्यांचा पराभव झालेला होता.(Lok Sabha Election Results 2019: वाराणसी मधून पंतप्रधान नरेंद्र मोदी 3 लाख 85 हजार मतांनी विजयी; जगभरातून शुभेच्छांचा वर्षाव)
तर काँग्रेस पक्षातील ज्योत्सना महंत यांचा विजय झाला. दरम्यान कारोबा जिल्ह्यातील पाली तानाखार मध्ये 61 हजार, रामपुर मधून 29 हजार मते आदित्यनंद यांना मिळत पिछाडी गाठली होती.