Chandrakant Patil: पुण्यात चंद्रकांत पाटील यांच्या ताफ्यातील गाडीचा अपघात; गणपतीच्या दर्शनासाठी आले असताना घडली घटना
दारू पिऊन गाडी चालवणाऱ्या एका चार चाकी चालकाने वाहनाला जोरदार धडक दिली.
Chandrakant Patil: पुण्यामध्ये सोमवारी रात्री चंद्रकांत पाटील यांच्या ताफ्यातील गाडीचा अपघात झाल्याची माहिती मिळत (Chandrakant Patil Convoy Car Accident)आहे. अपघातात सुदैवाने चंद्रकांत पाटील यांना कोणतीही इजा झाली नाही. एका मद्यपी वाहन चालकाने दारूच्या नशेत त्यांच्या ताफ्यातील गाडीला धडक दिली. चंद्रकांत पाटील गणपतीच्या (Ganeshotsav)दर्शनासाठी रात्री पुण्यात दाखल झाले होते. यात त्यांच्या गाडीचे काही प्रमाणात नुकसान झाल्याचं कळतंय. (हेही वाचा:Nagpur Audi Car Accident: भाजपचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मुलाच्या ऑडीची पाच वाहनांना धडक, दोघांना अटक )
पोलिसांनी या घटनेबाबत दिलेल्या माहितीनुसार, मद्यपी चालकाला ताब्यात घेण्यात आलं आहे. त्याची चौकशी सुरु असून पुढील कारवाई केली जात आहे. पुणे शहर परिसरात मोठ्या प्रमाणावर ड्रंक अँड ड्राईव्हच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. यामुळे सामान्य नागरिक आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करत आहेत.
दरम्यान, राज्यात अपघातांच्या घटनांमध्ये मोठी वाढ होत आहे. त्यातही महागड्या गाड्यांच्या अपघातांची संख्या जास्त आहे. काही महिन्यांपूर्वी पुण्यात बड्या उदयोगपतीच्या मुलाने दारूच्या नशेत त्याच्या पोर्शे कारने दोघांना उडवले होते. यात दोघांचा मृत्यू झाला होता. तर ताज्या घटनेत चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मुलाने नागपूरमध्ये मोठा अपघात केला होता. संकेत बावनकुळे याने 5 वाहनांना धडक दिली होती. त्याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.