Lok Sabha Elections 2024 मध्ये भाजपला पराभूत करणे शक्य, राजकीय रणनितीकार प्रशांत किशोर यांनी सांगितला फॉर्म्युला
भाजपला (BJP) आगामी लोकसभा निवडणुकीत पराभूत करता येणे शक्य आहे. परंतू, त्यासाठी विरोधकांना आपल्या रणनितीत प्रचंड बदल करावे लागतील.
भारतीय राजकारणातील अलिकडील चाणक्य अशी ओळख असलेल्या रणनितीकार प्रशांत किशोर (Prashant Kishor) यांनी लोकसभा निवडणूक 2024 (Lok Sabha Elections 2024) मध्ये भाजपला पराभूत करण्याचा फॉर्म्युला सांगितला आहे. भाजपला (BJP) आगामी लोकसभा निवडणुकीत पराभूत करता येणे शक्य आहे. परंतू, त्यासाठी विरोधकांना आपल्या रणनितीत प्रचंड बदल करावे लागतील. तसेच काही मुद्द्यांची फेरमांडणी करुन काम करावे लागेल, असेही त्यांनी म्हटले आहे. एनडीटीव्ही या वृत्तवाहिनीशी बोलताना प्रशांत किशोर यांनी ही मांडणी केली आहे. प्रशांत किशोर यांनी म्हटले आहे की, भाजपला हिंदुत्त्व, राष्ट्रवाद आणि विकास यांचा एक बलस्थान म्हणून वापर केला आहे. विरोधकांना भाजपचे हे सूत्र भेदण्यासाठी काम करावे लागेल. जर यावर काम केले तर विरोधक लोकसभा निवडणूक 2024 मध्ये भाजपला पराभूत करु शकतात असेही किशोर म्हणतात.
प्रशांत किशोर यांनी सावधगिरीचा इशारा देत म्हटले आहे की, पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत जरी भाजपला अनपेक्षीत निकाल लागला आणि विरोधकांचा विजय झाला तरीही भाजपला लोकसभा निवडणुकीत पराभूत करणे सोपे नाही. विद्यमान विरोधक आणि त्यांच्या आघाडीत भाजपला पराभूत करण्याची तितकी ताकद नाही. मी अशा एका विरोधी पक्षाला किंवा आघाडीला मदत करु इच्छितो जी भाजपला 2024 मध्ये जोरदार टक्कर देऊ शकेल. (हेही वाचा, Prashant Kishor On Rahul Gandhi: काँग्रेस पक्षाचे नेतृत्व कोणा एका व्यक्तीचा दैवी हक्क नाही; प्रशांत किशोर यांचा राहुल गांधी यांच्यावर निशाणा)
प्रशांत किशोर (Prashant Kishor) यांनी पुन्हा एकदा त्या 200 लोकसभा जागांकडे लक्ष्य वेधले आहे. ज्या ठिकाणी काँग्रेस आणि भाजपसोबत थेट टक्कर आहे. पाठिमागील दोन लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपने यातील 95 जागा जिंकल्या आहेत. ज्या 190 जागांमध्ये बदलतात. 45 वर्षांच्या प्रशांत किशोर यांना राजकीय रणनितीकार म्हणून ओळखले जाते. प्रशांत किशोर यांनी म्हटले आहे की, जो कोणताही पक्ष भाजपला पराभूत करु इच्छितो त्याला किमान 5 ते 10 वर्षांची रणनिती तयार करवी लागे. हे काम 5 महिन्यांमध्ये होऊ शकत नाही.
प्रशांत किशोर यांनी म्हटले की, पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेससोबत त्यांची सुरु असलेली चर्चा निष्फळ ठरली. त्यांनी म्हटले, इतरांसाठी हे स्वाभाविक वाटू शकते प्रशांत किशोर आणि काँग्रेसला एकत्र येऊन काम करायला हवे. मात्र, दोन्ही बाजूंनी एक एक पाऊल पुढे येत निर्णय घ्यायला हवा. मात्र, काँग्रेससोबत असे होऊ शकले नाही.