Bihar Election Results 2020: तेजस्वी यादव, तेज प्रताप यांच्यासोबतच बिहार मधील महत्त्वाचे नेते कोण आघाडीवर कोण पिछाडीवर?
बिहार विधानसभा निवडणूकीच्या मतमोजणीला सुरूवात झाली आहे. दरम्यान यामध्ये महागठबंधन आणि जेडीयू- भाजपा मध्ये कांटे की टक्कर सुरू आहे
बिहार विधानसभा निवडणूकीच्या मतमोजणीला सुरूवात झाली आहे. दरम्यान यामध्ये महागठबंधन आणि जेडीयू- भाजपा मध्ये कांटे की टक्कर सुरू आहे. मतदारांचे लक्ष राजदच्या तेज प्रताप यादव, तेजस्वी यादव यांच्या कामगिरीसोबतच लव सिन्हा, हिंदुस्तानी आवाम मोर्चा (HAM) पार्टी के प्रमुख जीतन राम मांझी (Jitan ram Manjhi) यांच्या कामगिरीकडे लागले आहे. दरम्यान सार्याच एक्झिट पोलचे निकाल हे महागठबंधनच्या बाजूने होते आणि तशीच परिस्थिती आता निकालांमध्ये परिवर्तित होताना दिसत आहेत. Bihar Assembly Elections Results 2020 Live Nsews Update इथे पहा लाईव्ह अपडेट्स
लालू प्रसाद यादव यांच्या उपस्थितीशिवाय यंदा पहिल्यांदा राजद पक्ष निवडणूकीमध्ये उतरला आहे. त्यांचे लेक तेज प्रताप यादव आणि तेजस्वी यादव यांनी प्रचाराची धुरा सांभाळली आहे. प्रचार सभांमध्ये यादव बंधूंना लोकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. तेजस्वी हे यादव कुटुंबाच्या परंपरागत राघोपूर विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढत आहेत आणि ते आघाडीवर आहेत. दरम्यान तेजप्रताप देखील आघाडीवर होते.
बिहारमध्ये विधानसभा मतदार संघ निहाय पहा कोण पुढे कोण मागे?
कॉंग्रेसचे नेता लव सिन्हा देखील आघाडीवर आहेत. ते बॉलिवूड अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांचे पुत्र आहेत. त्यासोबतच झमामगंज या विधानसभा मतदार संघामध्ये हिंदुस्तानी आवाम मोर्चा म्हणजेच हम पार्टीचे जीतन राम मांझी सुरूवातीला पुढे जात होते मात्र नंतर मागे पडले आहेत. दरम्यान हम या निवडणूकीमध्ये एनडीए सोबत आहेत. पप्पू यादव देखील मागे पडले आहेत.
मुजफ्फरपूर विधानसभा जागेवर एनडीएचे सुरेश शर्मा आणि महागठबंधनचे कॉंग्रेस नेता विजेंद्र चौधरी यांच्यामध्ये जबरदस्त टक्कर सुरू आहे. परसा सीटवर तेज प्रताप यांचे सासरे चंद्रिका राय थोडे मागे पडले आहेत.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)