Bihar Assembly Election 2020: 'हम' करणार नितीश कुमार यांच्या पक्षाशी आघाडी- जीतन राम मांझी

मात्र, शुभकार्य वेळेत होईल तेवढे चांगले असते. त्यामुळे ही घोषणा आजच करणे योग्य समजले. त्यानुसार ही घोषणा केली जात आहे.

Jitan Ram Manjhi | (Photo Credits: Twitter/ ANI)

बिहारचे माजी मुख्यमंत्री जीतन राम मांझी (Jitan Ram Manjhi) यांचा हिंदुस्तानी अवाम मोर्चा (Hindustani Awam Morcha) हा पक्ष विधानसभा निवडणूक 2020 मध्ये नितीश कुमार (Nitish Kumar) यांच्या संयुक्त जनता दल (JDU) पक्षासोबत आघाडी करणार आहे. जीतन राम मांझी यांनी स्वत:च ही माहिती बुधवारी (2 सप्टेंबर) दिली. जीतन राम मांझी यांनी म्हटले आहे की, त्यांचा पक्ष राष्ट्रीय जनतांत्रिक गठबंधनचा (राजग) एक भाग आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या जनता दल (युनाइटेड) हा पक्ष राजगचा एक प्रमुख घटक पक्ष आहे. त्यामळे सहाजिकच आता मांझी यांचही पक्ष नितीश कुमार यांच्या पक्षासोब बिहार विधानसभा निवडूक 2020 मध्ये सोबत लढणार आहे.

जीतन राम मांझी यांनी पत्रकारांशी बलताना बुधवारी सांगितले की, हम पार्टी राजग सोबत काम करणार आहे याची घोषणा 3 सप्टेंबरलाच करण्यात येणार होती. मात्र, शुभकार्य वेळेत होईल तेवढे चांगले असते. त्यामुळे ही घोषणा आजच करणे योग्य समजले. त्यानुसार ही घोषणा केली जात आहे.

मांझी यांनी म्हटले की, या आधीही आम्ही महागठबंधनमध्ये होतो. परंतू, अनेक वेळा सांगूनही तिथे समन्वय समिती बनवण्यात आली नाही. त्यासाठी राजदला आम्ही तीन ते चार महिन्यांचा वेळ दिला. काँग्रेसलाही दोन ते तीन महिन्यांचा वेळ दिला तरीही तिथे समन्वय समिती बणू शकली नाही. त्यामुळे आम्ही गठबंधनमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. (हेही वाचा, Bihar Assembly Election 2020: बिहार विधानसभेसाठी काँग्रेसची तयारी, राहुल गांधी व्हर्च्युअल सभांमधून करणार मार्गदर्शन)

दरम्यान, जनता दल युनाइटेड सोबत युती करताना काही अटी आहेत का असे वचारले असा, हम पार्टीच्या कोणत्याही अटी नाहीत. तसेच जागा वाटपाबाबतही अद्याप कोणतीही बोलणी झाली नाहीत. असे मांझी यांनी म्हटले आहे.