Ashadhi Wari 2022 : कॉंग्रेसचे जेष्ठ नेते दिग्विजय सिंह यांचं अनोख विठ्ठल प्रेम, 30 वर्षाहून अधिक काळापासून न चुकता लावतात पंढरपूरात हजेरी

आता मुख्यमंत्री नसले तरी ते दरवर्षी आषाढीला येतात. 1992 सालापासून ते नियमित वारी करतात.

दिग्विजय सिंह (Photo Credits-ANI)

आषाढी एकादशीला वारकऱ्यांना विठुरायाच्या भेटीची आस लागते आणि त्यांची पावलं पंढरपुराकडे ओढली जाऊ लागतात.  राज्यभरातून पालख्या आज पंढरपुरात दाखल होतात. कोरोनामुळे 2 वर्षांनंतर पायी चालत वारकरी पंढरपुरात दाखल होत असल्यानं वारकऱ्यामध्ये आनंदाचं वातावरण आहे. पण या  सामान्य, वारकऱ्याप्रमाणेचं कॉंग्रेसचे जेष्ठ नेते दिग्विजय सिंह (Digvijay Singh) न चुकता 30 वर्षाहून अधिक काळापासून पंढरपूरला (Pandharpur) हजेरी लावतात. महाराष्ट्राच्या (Maharashtra) मुख्यमंत्र्यांनी दर आषाढी एकादशीला शासकीय विठ्ठल रुख्मिणी पुजा करण्याची परंपरा आहे. दिग्विजय सिंह मध्य प्रदेशचे (Madhya Pradesh) मुख्यमंत्री असल्यापासून त्यांनी पंढपूरात येण्यास सुरुवात केली. आता मुख्यमंत्री नसले तरी ते दरवर्षी आषाढीला येतात. 1992 सालापासून ते नियमित वारी करतात.

 

पंढरपूरच्या विठ्ठल-रखुमाईच्या मंदिरापासून ते गल्लीबोळ्यातील विठ्ठल मंदिरं देखील आषाढी एकादशीच्या निमित्ताने उजळून निघतात. यंदा  10 जुलैला आषाढी एकादशी  साजरी केली जाणार आहे.  या निमित्ताने वारकरी, विठू माऊलींच्या भक्तांनी महिना भरापूर्वीपासून वारीत सहभाग घेतला आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून आषाढ एकादशीला दिंड्या पंढरपूरात पोचतात. खानदेश (Khandesh) ,मराठवाडा (Marathwada), विदर्भ (Vidarbh) , आणि मध्यप्रदेशातून या सोहळ्यात मोठ्या प्रमाणात भाविक सामील झालेले आहेत. (हे ही वाचा:-CM Eknath Shinde : यंदा विठ्ठल-रुक्मिणी शासकीय महापूजेचा मान मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना!)

 

आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुरात विठ्ठल-रुक्मिणी यांची शासकीय महापूजेचा मान राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा असतो. यंदा विठ्ठल-रुक्मिणी शासकीय महापूजेचा मान मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना (CM Eknath Shinde) मिळाला आहे. एकनाथ शिंदे राज्याचे वीसावे मुख्यमंत्री असुन शिवसेनेचे (Shiv Sena) चौथे मुख्यमंत्री आहेत.गेल्या वर्षी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि पत्नी रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) यांनी पूजा केली होती. पण  गेल्या काही दिवसापूर्वी राज्यात झालेला सत्ता संघर्ष पाहता यंदाच्या पूजेसाठी  उद्धव ठाकरे जाणार की देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) अशा चर्चा सुरू होत्या. अखेर या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे. राज्याचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावर्षी पंढरपूरात शासकीय महापूजा करणार यावर शिक्का मोर्तब झाला आहे.