महाराष्ट्र आणि हरियाणा नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांच्यामध्ये 'या' राज्यात होणार टक्कर; सोबत बड्या नेत्यांचा असेल फौजफाटा

आता या दोन राज्यातील निवडणूक निकालानंतर झारखंडमध्ये विधानसभा निवडणूक मतदान पार पडणार आहे.

PM Modi and Rahul Gandhi (Photo Credits: PTI)

महाराष्ट्र नंतर हरियाणा राज्यात 21 ऑक्टोबरला विधानसभा निवडणूका पार पडल्या. या दोन्ही राज्यात भाजपाच्या बाजूने जनादेश असेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. देशातील सर्वात जुना पक्ष म्हणून कॉंग्रेस पक्षाची ओळख असली तरीही त्यांना अपेक्षित यश मिळवणं कठीण होणार असल्याचे अंदाज समोर आले आहेत. महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभा निवडणूक निकाल 24 ऑक्टोबर दिवशी लागणार आहे. आता या दोन राज्यातील निवडणूक निकालानंतर झारखंडमध्ये विधानसभा निवडणूक मतदान पार पडणार आहे. आगामी काही दिवसातच निवडणूक आयोगाकडून झारखंड विधानसभेसाठी मतदानाची तारीख जाहीर होणार आहे.

भाजपाने काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र आणि हरियाणा राज्यात विधानसभेचा निकाल लागल्याशिवाय झारखंडमध्ये प्रचाराला सुरूवात केली जाणार नाही असे म्हटलं होतं. भाजपाने झारखंड विधानसभा निवडणूकीसाठी राष्ट्रीय उपाध्यक्ष ओम माथूर यांना प्रभारी म्हणून जाहीर केलं होतं. झारखंडमध्ये भाजपाचं मिशन 65+ असं आहे. अद्याप त्यांचे विरोधक कॉंग्रेस पक्षाकडून कोणत्याही राजकीय रणनितींचा खुलासा करण्यात आलेला नाही. पण झारखंड विधानसभा निवडणूकीमध्ये नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी सक्रिय सहभाग घेतील असे सांगण्यात आले आहे.

सध्या देशभरात कॉंग्रेसमध्ये अंतर्गत कलहामुळे पक्ष कमजोर झाल्याने मतदारांना प्रभावित करण्यासाठी आता कॉंग्रेस काय करणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. झारखंडमध्ये 2014 च्या विधानसभा निवडणूकीमध्ये यश मिळवल्यानंतर 28 डिसेंबर दिवशी रघुबर दास यांच्या नेतृत्त्वाखाली भाजपाने सरकार स्थापन केलं. त्यामुळे डिसेंबर 2019 पूर्वी झारखंडमध्ये विधानसभा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला जाईल.

2014 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणूकीमध्ये एकूण 81 जागांपैकी भाजपाकडे 43 जागा आहेत. तर 19 जागा झारखंड मुक्ती मोर्चाकडे आहेत. 8 जागांवर झारखंड विकास मोर्चा आणि 6 जागांवर कॉंग्रेसचे आमदार आहेत.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif