Atishi Takes Oath as CM of Delhi: आतिशी मार्लेना यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्री म्हणून घेतली शपथ; बनल्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री (Watch Videos)

अरविंद केजरीवाल यांच्यानंतर आता आतिशी या दिल्लीच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे.

(Photo Credits: ANI)

Atishi Takes Oath as CM of Delhi: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्याची घोषणा केल्यानंतर दिल्लीच्या राजकारणात मोठी खळबळ उडाल्याची पहायला मिळत होती. जिकडेतिकडे दिल्लीचा नवा मुख्यमंत्री कोण असेल? याची उत्सुकता निर्माण झाली होती. मात्र, अखेर दिल्लीच्या मुख्यमंत्री(Delhi CM) म्हणून आतिशी(Atishi) मार्लेना यांची आम आदमी पार्टीने एकमताने निवड केली. या निवडीनंतर आज शनिवारी (२१ सप्टेंबर) आतिशी यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ(Atishi Takes Oath as CM of Delhi) घेतली.

दिल्लीच्या मुख्यमंत्री म्हणून आतिशी यांनी नुकतीच शपथ घेतली. त्यांचा शपथविधी सोहळा उपराज्यपालांच्या निवासस्थानी पार पडला. आतिशी या आपच्या आमदार आहेत. सुषमा स्वराज, शीला दीक्षित यांच्यानंतर आतिशी या दिल्लीच्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री असणार आहेत. आतिशी यांच्यासह सौरभ भारद्वाज, कैलाश गहलोत, गोपाल राय, इमरान हुसैन, मुकेश अहलावत हे पाच आमदारही शपथ घेणार आहेत. त्यांना कुठली खाती मिळणार हे अद्याप स्पष्ट झाले नाही.

आतिशी मार्लेना यांनी घेतली शपथ

आतिशी या आम आदमी पार्टीमधील वरिष्ठ नेत्या व सामाजिक कार्यकर्त्या म्हणून परिचित आहेत. 2013 मध्ये ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या भ्रष्टाचाराविरोधातील आंदोलनात त्या सहभागी झाल्या होत्या. त्याचदरम्यान, आतिशी या केजरीवाल व इतर नेत्यांच्या संपर्कात आल्या. पुढे त्यांनी आम आदमी पार्टीद्वारे राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. त्या दिल्लीतल्या कालकाजी विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आल्या आहेत.