Police Sub-Inspector Shot Dead in Ranchi: रांचीमध्ये पोलीस उपनिरीक्षकाची गोळ्या झाडून हत्या, प्रकरणाच्या तपासासाठी SIT ची स्थापना

स्थानिक नागरिकांना ही घटना कळताच त्यांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली.

Gun Shot | Pixabay.com

Police Sub-Inspector Shot Dead in Ranchi: झारखंड (Jharkhand) ची राजधानी रांची (Ranchi) मध्ये एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथे गुन्हे शाखेच्या उपनिरीक्षकाची गोळ्या झाडून हत्या (Police Sub-Inspector Shot Dead) करण्यात आली. घटनेची माहिती मिळताच संपूर्ण परिसरात घबराट पसरली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन तपास सुरू केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हे प्रकरण रांचीमधील रिंगरोडचे आहे. येथे स्पेशल ब्रँचमध्ये तैनात असलेल्या सब इन्स्पेक्टरला गोळी लागली, ज्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. अनुपम कछाप, असे या उपनिरीक्षकाचे नाव असून त्यांचा मृतदेह रांची रिंगरोड येथून सापडला आहे. स्थानिक नागरिकांना ही घटना कळताच त्यांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली. (हेही वाचा -Girl Shot Dead in Patna: पाटण्यात 4 वर्षीय मुलीची गोळ्या झाडून हत्या; अज्ञात हल्लेखोराविरुद्ध गुन्हा दाखल)

दरम्यान, अनुपम यांच्या हत्येची माहिती मिळताना पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी तपास सुरू केला. पोलिसांनी आजूबाजूच्या लोकांची चौकशी केली. सध्या रांची पोलिसांचे पथक या संपूर्ण घटनेचा तपास करण्यात व्यस्त आहे. जवळपासचे सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे. (हेही वाचा - BJP Leader Monu Kalyane Shot Dead: इंदूरमध्ये भाजप नेते मोनू कल्याणे यांची गोळ्या झाडून हत्या)

ANI ट्विट - 

या घटनेनंतर भाजप झारखंडचे प्रदेशाध्यक्ष बाबुलाल मरांडी यांनी रांची येथील रिम्स रुग्णालयात जाऊन मृत उपनिरीक्षक अनुपम यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली आणि त्यांचे सांत्वन केले. मृत अनुपम कछाप हे 2018 बॅचचे उपनिरीक्षक होते.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif