Vande Bharat Express: ​​पंतप्रधान मोदी यांनी 6 नवीन वंदे भारत एक्सप्रेसना दाखवला हिरवा झेंडा; बिहार-यूपीसह या राज्यांतील प्रवाशांना होणार फायदा

Photo Credit- X

Vande Bharat Express: ​​पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 6 नवीन वंदे भारत एक्सप्रेस गाड्यांना हिरवा झेंडा (PM Modi Vande Bharat Train Flag Off) दाखवला. टाटानगर जंक्शन रेल्वे स्थानकावर पंतप्रधान मोदी यांनी टाटानगर-पाटणा वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला. या 6 वंदे भारत एक्सप्रेस गाड्यांपैकी बिहारमधिये 4 वंदे भारत ट्रेनचा लाभ मिळणार आहे. ज्यात भागलपूर-हावडा, गया-हावडा, टाटानगर-पाटणा आणि देवघर-वाराणसी वंदे भारत एक्सप्रेस गाड्यांचा समावेश आहे. (हेही वाचा: Vande Bharat Trains: लवकरच सुरु होणार Pune-Hubli आणि Kolhapur-Pune मार्गावर आठ डब्यांच्या वंदे भारत गाड्या; जाणून घ्या वेळा, थांबे आणि इतर तपशील)

पंतप्रधान मोदींचा ड्रीम प्रोजेक्ट

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ड्रीम प्रोजेक्टमध्ये समाविष्ट असलेली मिनी हायस्पीड ट्रेन, गया जंक्शन मार्गे हावडा दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसचे उद्घाटन व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. गया आणि हावडा दरम्यान धावून, कोडरमा, पारसनाथ, गोमो, धनबाद, आसनसोल, दुर्गापूर मार्गे हावडा जंक्शनला पोहोचेल. गया येथून ट्रेन 11:05 वाजता निघाली. गया येथे वंदे भारत एक्सप्रेसचे आगमन होताच केंद्रीय मंत्री जीतन राम मांझी, खासदार अभय कुशवाह, सहकार मंत्री डॉ.प्रेम कुमार आदींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वंदे भारत एक्सप्रेसचे स्वागत केले. (हेही वाचा: Stone Pelting on Vande Bharat Express: वंदे भारत एक्स्प्रेसवर दगडफेक; खिडक्यांच्या काचा तुटल्या, छत्तीसगडमध्ये ट्रायल रनदरम्यान घडली घटना)

या मार्गांवर गाड्या धावणार

टाटानगर-पाटणा, ब्रह्मपूर-टाटानगर, राउरकेला-हावडा, देवघर-वाराणसी, भागलपूर-हावडा आणि गया-हावडा हे सहा नवीन मार्ग समाविष्ट असतील. म्हणजेच आजच्या सहा वंदे भारत ट्रेनमुळे बिहार, झारखंड, ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या प्रवाशांचा प्रवास सुकर होणार आहे. 15 फेब्रुवारी 2019 रोजी पहिली वंदे भारत ट्रेन सुरू झाली. या गाड्यांची क्षमता ताशी १६० किलोमीटर वेगाने धावण्याची आहे.

या गाड्या जलद कनेक्टिव्हिटी देतील, असे पंतप्रधान कार्यालयाने एका निवेदनात म्हटले आहे. वंदे भारत एक्स्प्रेसचा नियमित प्रवासी, व्यावसायिक, व्यापारी आणि विद्यार्थ्यांना फायदा होईल. या गाड्या देवघर (झारखंड) येथील बैद्यनाथ धाम, वाराणसी (उत्तर प्रदेश) येथील काशी विश्वनाथ मंदिर, कोलकाता (पश्चिम बंगाल) मधील कालीघाट, बेलूर मठ इत्यादी तीर्थक्षेत्रांना जलद प्रवास करून धार्मिक पर्यटनाला चालना देतील. धनबादमधील कोळसा आणि खाणी उद्योग, कोलकात्यात ज्यूट उद्योग, दुर्गापूरमधील लोह आणि पोलाद उद्योगांनाही मोठी चालना मिळेल, असे पंतप्रधान कार्यालयातील निवेदनात नमूद करण्यात आले आहे.