सुधारित नागरिकत्व कायद्याला समर्थन दर्शवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवर सुरू केली #IndiaSupportsCAA मोहीम
या कायद्याविरोधात अनेक ठिकाणी झालेल्या आंदोलनाला हिसंक वळण लागल्याच्या घटना घडत आहेत. यात अनेकांचे प्राणही गेले आहेत. परंतु, आता पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी या कायद्याच्या समर्थनात ट्विटरवर #IndiaSupportsCAA ही मोहीम चालू केली आहे. यात मोदी यांनी सुधारित नागरिकत्व कायद्यामुळे कोणाच्याही नागरिकत्वावर बाधा येणार नसून केवळ शरणार्थींना भारतीय नागरिकत्व मिळणार असल्याचं सांगितलं आहे.
देशभरात सुधारित नागरिकत्व कायद्याचा (Citizenship Amendment Act) विविध ठिकाणी विरोध करण्यात येत आहे. या कायद्याविरोधात अनेक ठिकाणी झालेल्या आंदोलनाला हिसंक वळण लागल्याच्या घटना घडत आहेत. यात अनेकांचे प्राणही गेले आहेत. परंतु, आता पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी या कायद्याच्या समर्थनात ट्विटरवर #IndiaSupportsCAA ही मोहीम चालू केली आहे. यात मोदी यांनी सुधारित नागरिकत्व कायद्यामुळे कोणाच्याही नागरिकत्वावर बाधा येणार नसून केवळ शरणार्थींना भारतीय नागरिकत्व मिळणार असल्याचं सांगितलं आहे.
तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना NAMO अॅपवर #IndiaSupportsCAA या हॅशटॅगच्या माध्यमातून सुधारित नागरिकत्व कायद्याविषयी कोणतीही माहिती शोधण्याचे आवाहन केले आहे. या अॅपवरील माहिती आणि व्हिडिओज सर्वांना शेअर करा तसेच सुधारित नागरिकत्व कायद्याला समर्थन दर्शवण्यासाठी #IndiaSupportsCAA या हॅशटॅगचा वापर करा, असंही मोदी यांनी म्हटलं आहे. (हेही वाचा - CAA: भारतीय नागरिकत्व कसे मिळते? काय आहेत राज्यघटनेतील तरतुदी? वाचा सविस्तर)
सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात विरोधी पक्ष जनतेमध्ये गैरसमज पसरवत आहे. त्यामुळे हा गैरसमज दूर करण्यासाठी भाजपने देशभरात जनजागृती मोहीम हाती घेतली आहे. भाजपचे अनेक दिग्गज नेते या कायद्याच्या समर्थनात सभा घेत आहेत. या सभांमधून या कायद्याविषयीचा गैरसमज दूर करण्यात येत आहे.
सुधारित नागरिकत्व कायदा (Citizen Amendment Act) भारतामध्ये अस्तित्त्वात आल्यानंतर देशभरातील नागरिक त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. प्रामुख्याने ईशान्य भारतातून या कायद्याला प्रखर विरोध करण्यात येत आहे. 15 डिसेंबर रोजी रात्री दिल्लीतील जामिया मिलिया इस्लामिया या विद्यापीठातील विद्यार्थी आंदोलन करत रस्त्यावर उतरले होते. या आंदोलनामुळे हे विद्यापीठ 5 जानेवारीपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे.