PM Narendra Modi Inaugurate Pradhanmantri Sangrahalaya: पीएम मोदींनी केले पंतप्रधान संग्रहालयाचे उद्घाटन; पहिल्या तिकीटची केली खरेदी
गेल्या महिन्यात पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत नेहरू संग्रहालयाचे पीएम संग्रहालयात रूपांतर करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
PM Narendra Modi Inaugurate Pradhanmantri Sangrahalaya: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आज दिल्लीतील तीन मूर्ती भवन येथे पंतप्रधान संग्रहालयाचे (Pradhanmantri Sangrahalaya) उद्घाटन केले. उद्घाटनानंतर त्यांनी आधी तिकीट काढले आणि नंतर संग्राहलयाची झलक पाहण्यासाठी ते आत गेले. आतापर्यंतच्या सर्व पंतप्रधानांची कामे पंतप्रधान संग्रहालयात प्रदर्शित करण्यात येणार आहेत. पूर्वी हे नेहरू संग्रहालय इमारत म्हणून ओळखले जात होते. गेल्या महिन्यात पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत नेहरू संग्रहालयाचे पीएम संग्रहालयात रूपांतर करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
मंत्रिमंडळाच्या बैठकीत पंतप्रधान मोदी म्हणाले होते की, माजी पंतप्रधानांच्या योगदानाची कबुली देण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे. आपल्या सर्वांना पंतप्रधानांचे योगदान जाणून घ्यायचे आहे. पंतप्रधान संग्रहालयात सर्व माजी पंतप्रधानांच्या कार्यांचे प्रदर्शन केले जाणार आहे. माजी पंतप्रधानांबद्दल मौल्यवान माहितीसाठी त्यांच्या कुटुंबीयांशीही संपर्क साधण्यात आला होता. (हेही वाचा - Mushtaq Ahmed Zargar: अल उमर मुजाहिद्दीनचा कमांडर इन चीफ मुश्ताक अहमद जरगर दहशतवादी घोषित; गृह मंत्रालयाचा मोठा निर्णय)
महत्त्वाचा पत्रव्यवहार, काही वैयक्तिक वस्तू, भेटवस्तू आणि स्मृतीचिन्ह, सन्मान, पदके, स्मृती चिन्हे, नाणी इत्यादी देखील संग्रहालयात प्रदर्शनात आहेत. या संग्राहलयात दूरदर्शन, चित्रपट विभाग, संसद टीव्ही, संरक्षण मंत्रालय, मीडिया हाऊसेस (भारतीय आणि परदेशी), प्रिंट मीडिया, परदेशी वृत्त संस्था, परराष्ट्र व्यवहार मंत्रालय इत्यादी संस्थांद्वारे माहिती संकलित करण्यात आली आहे.
या पंतप्रधानांविषयी माहिती जाणून घेता येईल -
या संग्रहालयात जवाहरलाल नेहरू, गुलजारी लाल नंदा, लाल बहादूर शास्त्री, इंदिरा गांधी, मोरारजी देसाई, चौधरी चरणसिंग, राजीव गांधी, विश्वनाथ प्रताप सिंग, चंद्रशेखर, नरसिंह राव, अटल बिहारी वाजपेयी, एचडी देवेगौडा, आयके गुजरा सिंह, मनमोहन सिंह यांची माहिती देण्यात आली आहे.
पंतप्रधान संग्रहालयात काय आहे विशेष?
पहिल्या गॅलरीत 1947 चा इतिहास दाखवला जाईल. तसेच येथे तुम्हाला पंडित जवाहरलाल नेहरूंबद्दल माहिती मिळेल. त्यानंतर भारताचे भावी आयुष्य कळेल. संग्रहालयाच्या पुढे एक नवीन इमारत आहे. येथे तुम्हाला स्वतंत्र भारतातील सर्व पंतप्रधानांची माहिती मिळेल.
पीएम म्युझियम भारताच्या स्वातंत्र्यलढ्यापासून ते संविधान निर्मितीपर्यंतची कथा सांगणार आहे. आपल्या पंतप्रधानांनी देशाला विविध आव्हानांतून कसे सोडवले आणि देशाची सर्वांगीण प्रगती कशी केली हे सांगितले आहे. संग्रहालयाच्या इमारतीची रचना उदयोन्मुख भारताच्या कथेपासून प्रेरित आहे. डिझाइनमध्ये शाश्वत आणि ऊर्जा संवर्धनाची वैशिष्ट्ये आहेत.
अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर -
पंतप्रधान संग्रहालयात अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित दळणवळण सुविधांची व्यवस्था तरुणांना सोप्या आणि मनोरंजक पद्धतीने माहिती देण्यासाठी करण्यात आली आहे. प्रदर्शन अत्यंत संवादात्मक बनवण्यासाठी होलोग्राम, व्हर्च्युअल रिअॅलिटी, ऑगमेंटेड रिअॅलिटी, मल्टी-टच, मल्टी-मीडिया, इंटरएक्टिव्ह किऑस्क, कॉम्प्युटराइज्ड कायनेटिक स्कल्पचर, स्मार्टफोन अॅप्लिकेशन्स, इंटरएक्टिव्ह स्क्रीन्स इत्यादी स्थापित करण्यात आले आहेत.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)