विद्यार्थ्यांनी बनवलेला जगातील सर्वात हलका उपग्रह 'कलामसॅट'च्या यशस्वी प्रक्षेपणानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून कौतुकाचा वर्षाव

इंडियन स्पेस रिसर्च सेंटर इस्रो ने जगातील सर्वात हलक्या उपग्रहाचे 'कलामसॅट'चं यशस्वी प्रेक्षपण केलं.

ISRO launched Kalamsat, world's lightest satellite from Sriharikota (Photo Credits: ISRO)

'इंडियन स्पेस रिसर्च सेंटर' (Indian Space Research Organisation) ने जगातील सर्वात हलक्या उपग्रहाचे 'कलामसॅट'चं (Kalamsat) यशस्वी प्रेक्षपण केलं. हा उपग्रह भारतीय विद्यार्थ्यांनी बनवला असून काल रात्री 11:40 मिनिटांनी श्रीहरीकोटा (Sriharikota) येथील सतिश धवन स्पेस सेंटरमधून (Satish Dhawan Space Centre) या उपग्रहाचे प्रेक्षपण करण्यात आले. हा उपग्रह 'स्पेस किड्स इंडिया' (Space Kidz India) या संस्थेच्या विद्यार्थ्यांनी तयार केला होता. 'कलामसॅट' सोबतच इस्रोने 'मायक्रोसॅट-आर' (Microsat-R) चे देखील प्रक्षेपण केले. हे दोन्ही उपग्रह पोलार सॅटलाईट लॉन्च व्हेहिकल (PSLV)46 च्या मदतीने लॉन्च करण्यात आले. (ISRO च्या GSAT-7A उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; हवाई दलाचे सामर्थ्य वाढणार)

या उपग्रहांच्या यशस्वी प्रक्षेपणानंतर विद्यार्थ्यांच्या या यशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विट करत अभिनंदन केले आहे. "पीएसएलव्हीच्या आणखी एका यशस्वी प्रक्षेपणाबद्दल वैज्ञानिकांचं अभिनंदन. भारताच्या प्रतिभावान विद्यार्थ्यांनी बनवलेल्या 'कलामसॅट'चं यशस्वी प्रक्षेपण झालं"

कलामसॅटचे प्रक्षेपण इस्रोने अगदी नि:शुल्क केले. इस्रो चिफ के. सिवन यांनी सांगितले की, "भारतातील सर्व विद्यार्थ्यांसाठी इस्रोची दारे सदैव खुली राहतील. तुमचे उपग्रह घेऊन या, आम्ही ते लॉन्च करु. वैज्ञानिक क्षेत्रात भारताला जागृक करुया."

'कलामसॅट'चं वजन 1:26 किलोग्रॅम होतं. म्हणजेच हा उपग्रह लॅपटॉपपेक्षाही हलका होता. हा उपग्रह तयार करण्यासाठी 12 लाख रुपये खर्च आला असून त्याची पूर्णपणे निर्मिती होण्यासाठी केवळ 6 दिवसांचा कालावधी लागला. माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे अब्दुल कलाम यांना आदरांजली म्हणून या उपग्रहाला त्यांचे नाव देण्यात आले. दुसरा उपग्रह 'मायक्रोसॅट-आर' वजन 700 किलोग्रॅम वजनाचा होता.